राजमाता प्रतिष्ठानच्या वतीने 1200 गरजू कुटूंबाना किराणा माल साहित्याचे वाटप
सांगोला/प्रतिनिधी ः सध्या जगभरात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे भारत सरकारने देशासह राज्यामध्ये संचारबंदी तसेच लॉकडाऊन जाहीर केले आहे. या लॉकडाऊनच्या काळात शहरातील सर्व व्यावसायिक दुकाने बंद आहेत. त्याचबरोबर सर्व कष्टकरी, बांधकाम कामगार, तसेच इतर छोटी-मोठी कामे करून पोट भरणारे नागरिक यांचा व्यवसाय बंद झाल्यामुळे काही प्रमाणात या गोरगरीब जनतेस या संकटाचा सामना करावा लागत आहे. तर लॉकडाऊनच्या परिस्थितीत गरीब मजूर हातावर पोट असणारे यांच्यावर उपासमारीची वेळ येत आहे. याच गोष्टीची संवेदनशिलता लक्षात घेवून सांगोला तालुक्यातील सामाजिक कामात बांधिलकी जपणारे तसेच सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणार्या राजमाता प्रतिष्ठानचे अध्यक्ष नगरपरिषदेचे गटनेते तथा नगरसेवक आनंदा माने यांनी शहरातील 1200 गोरगरीब व गरजू कुटूंबांना किराणा माल साहित्याचे वाटप केले आहे.
यामध्ये शहरातील सनगर गल्ली, खडतरे गल्ली, भारत गल्ली, संजयनगर झोपडपट्टी, इंदिरानगर, मुजावर गल्ली, पठाण वस्ती, मिरज रोड लक्ष्मीनगर, बुरूड गल्ली, गोंधळ गल्ली, एखतपूर रोड, चिंचोली रोड, धनगर गल्ली, भिमनगर, साठेनगर, परिट गल्ली तसेच ज्या इतर गरजू लोकांनी नगरसेवक आनंदा (भाऊ) माने यांना संपर्क करून अडचणी सांगितल्या, अशाही नागरिकांना किराणा माल साहित्याचे वाटप घरपोच केले आहे.
या कोरोनाच्या परिस्थितीमुळे शहरातील सर्व प्रकारच्या अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने तसेच व्यवसाय बंद आहेत. त्यामुळे प्रत्येक वेळी अडचणीच्या काळात वेळोवेळी नगरसेवक आनंदा माने व राजमाता प्रतिष्ठान (रजि.) ही संस्था सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असते. या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये राजमाता प्रतिष्ठानने अन्नधान्याचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. याबद्दल नागरिकांच्या वतीने नगरसेवक आनंदा(भाऊ) माने व राजमाता प्रतिष्ठानचे आभारही मानण्यात येत आहेत.
चौकट- दानशूर व्यक्तींनीही लावला हातभार
नगरसेवक आनंदा (भाऊ) माने यांनी दानशूर व्यक्तींना आवाहन केल्याप्रमाणे धनगर समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष दत्ताभाऊ जानकर, विकास चंदर नागदेव, संजय माने, प्रशांत बाळासाहेब गावडे, तोहिद शेख, राजेश खडतरे, वामन माने यांच्यासह इतरही लोकांनी या सामाजिक कार्यामध्ये आर्थिक मदत देवून सहकार्य केले आहे. तर तानाजी केदार गुरूजी व मंगलदिप किराणाचे सुनिल भंडारे यांनी किराणा साहित्य देवून सहकार्य केले. त्यामुळे या सर्वांचे आभार राजमाता प्रतिष्ठानच्या वतीने आनंदा(भाऊ) माने यांनी मानले आहेत.
0 Comments