टेंभू योजनेतील बंदीस्त पाईपलाईनचे पाणी येत्या आठवड्यात सांगोला तालुक्यात पोहचणार -आमदार शहाजीबापू पाटील
सांगोला (प्रतिनिधी) टेंभू उपसा सिंचन प्रकल्पातील कडलास,सोनंद, बुरंगेवाडी, कोळे, राजुरी, वाटंबरे, निजामपूर, मिसाळवाडी, जुजारपूर, हातीद, व इतर अशी एकूण 27 गावांच्या बंदीस्त पाईपलाईनची चाचणी करण्यासाठी येत्या आठवड्यामध्ये पाणी सोडण्यात येणार आहे, सदरची चाचणी यशस्वी झाल्यानंतर या सर्व गावांमधील बारमाही पिकांना ठिबक /तुषार सिंचन पद्धतीने मागणीप्रमाणे पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली.लाभक्षेत्रातील या सर्व गावांना पाणी पोहचल्या नंतर शेतकऱ्यांनी आपली मागणी नोंदवून पाणीपट्टी भरल्यानंतर सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या मागणीप्रमाणे पाणी दिले जाणार आहे या बंदिस्त पाईप लाईन योजनेमुळे लाभक्षेत्रातील 27गावांमधील 17हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी पत्रकाद्वारे दिली.

0 Comments