सोलापूर- प्रेक्षा प्रणेता आचार्य श्री महाप्रज्ञ यांच्या जन्म शताब्दीनिमित्त "एक शाम महाप्रज्ञ के नाम" हा कार्यक्रम आयोजित केला होता . हा कार्यक्रम " गुरु आणा पर मिट जावं,गुरु चरणा मे झुक जावा ,लेकर हम स्वागत के सुंदर फुल"या भावगीताने कार्यक्रमाला सुरुवात झाली. याकरिता खास भुवनेश्वरवरून श्रद्धानिष्ठ, सं-गायक कमल सेठीया यांना बोलावण्यात आले होते .यावेळी तेरापंथ सभा अध्यक्ष कैलास कोठारी, स्थानकवासी संघाचे अध्यक्ष सुभाष लोणावत , मूर्तिपूजक संघाचे संकलेचा तसेच जगदीश पाटील, नगरसेविका अंबिका पाटील , राजू पाटील, यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.1.तेरापथ रो भाग्य विधाता श्रमण संघ रो सक्षम त्राता..2.जिस भजन मे भक्ति भाव ना हो उसको भजन को गाना ना चाहिये..3.प्रभु पार्श्व देव चरणों मे शत शत प्रणाम हो..4.नाम है तेरा तारणहारा कब तेरा दर्शन होगा ,जिनकी प्रतिमा इतनी सुन्दर वो कितना सुन्दर होगा... असे विविध भक्तीगीत सादर करण्यात आले त्याला भक्तगणा मधून भरपूर प्रतिसाद मिळत होता.हा कार्यक्रम भवानी पेठ येथील आचार्य श्री महाश्रमन प्रवास स्थल येथे आयोजित करण्यात आला होता.वरील कार्यक्रम मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला, यासाठी समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.तसेच दिनांक 22 आणि 23 मार्च रोजी आचार्य श्री महाप्रज्ञजी यांचा सोलापूर शहरात आगमन होणार आहे त्यानिमित्त व्याख्यानाचा ही आयोजन केले असल्याचे आर्की. शैलेंद्र सुराणा यांनी सांगितले.वरील कार्यक्रमाची प्रस्तावना तेरापंथ युवक परिषदेचे अध्यक्ष चेतन सुराणा यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन युवक परिषदेचे मंत्री पारस कोचर यांनी केला . सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय सेठीया, तीलोकचंद बोथरा, विनोद सेठीया, गौतम छाजेड ,भावेश सेठीया, राजेश छाजेड , मिलाप चोरडिया, कमलेश मांडोत , जिनेंद्रा सुराणा यांनी परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमास जैन बांधव व इतर नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
0 Comments