माढ्यात कचरा गोळा करुन विद्यार्थ्यानी केली इको फ्रेंडली होळी
कचरा गोळा करीत त्यांची होळी करीत स्वच्छतेचा संदेश माढ्यातील शुक्रवार पेठेतील चिमुकल्या विद्यार्थ्यानी दिला -
प्रतिनिधी (माढा) माढ्यातील शालेय विद्यार्थ्यांनी आपल्या भागातील केर कचरा गोळा करुन त्यांची होळी करीत स्वच्छतेचा संदेश दिला.शुक्रवार पेठेत ठीक ठिकाणी साठलेला केरकचरा एकत्रित करुन तो एका ठिकाणी जमवला गेला.या कचर्याची विल्हेवाट होळी तुन लावण्यात आली.शुक्रवार पेठेतील नागरिकांना या विद्यार्थ्यानी आपले घर व परिसर स्वच्छ ठेवण्याची शपथ दिली.या इंको फ्रेंडली होळी साजरी केल्याने मुलांचे कौतुक करण्यात आले.यावेळी पार्श्व शहा,शिवराज गोटे,ऋतुराज कुर्डे,रेहान आतार,भाग्यश्री गोटे,झोया आतार
आदी विद्यार्थि उपस्थित होते.
0 Comments