फीनिक्स इंग्लिश स्कूल मध्ये प्लास्टिक कागदासह अस्वच्छतेच होळी...
अकलूज ( प्रतिनिधी ) होळीच्या सणाचे औचित्य साधून फीनिक्स स्कूलच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी मिळून परिसरातील प्लास्टिक कागद, कचरा गोळा करून अस्वछतेची होळी केली .भारतीय संस्कृती मध्ये हिंदू धर्मात होळीचा सण साजरा करण्यामागचा हेतू वाईट प्रवृत्तीचा नाश करने असा आहे. प्लास्टिक वापरामुळे होणारे परिणाम व अस्वच्छतेमूळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम याचा संदेश देत लहान मुलांनी अनोख्यारीतीने होळीचा सण साजरा केल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. याप्रसंगी शाळेच्या संचालिका व मुख्याध्यापिका नूरजहाँ शेख यांनी आपल्या देशाची संस्कृती जोपासत धार्मिक सण उत्सव हे समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी साजरे केले जातात. धार्मिक रूढी परंपरांची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी व त्यातून अंधश्रद्धा मुक्त भारत निर्माण व्हावा पर्यावरण जोपासण्याची आवड विद्यार्थ्यांमध्ये बालवयापासूनच निर्माण व्हावी. धर्म आणि जात पात हा भेद विसरून नवीन पिढीने एकमेकांच्या धार्मिक भावनांचा आदर करावा या हेतूने होळीचा सण साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम साजरा करण्यासाठी नूरजहाँ शेख नलिनी चव्हाण व भोसले यांनी परिश्रम घेतले.
0 Comments