Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूर जिल्ह्यात पेट्रोल डिझेल विक्री बंद

सोलापूर जिल्ह्यात पेट्रोल डिझेल विक्री बंद



सोलापूर (प्रतिनिधी):- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी असताना देखिल नागरिक मोठ्याप्रमाणात बाहेर पडत असल्याने जिल्हा प्रशासनाने आता पेट्रोल, डीझेल विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी तसे आदेश दिले आहेत.
सोलापूर जिल्ह्यामध्ये पाच पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. तथापी पेट्रोल डिझेल पंपावर दुचाकी चारचाकी गाड्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे.
अत्यावश्यक आणि जीवनावश्यक सेवा वगळून हा निर्णय सर्वांना लागू असणार आहे. २५ मार्चच्या मध्यरात्री १२ पासून ३१ मार्च पर्यंत हा निर्णय लागू राहिल.
जिल्ह्यातील नागरिकांचा बेजबाबदारपणा वाढत असल्याने आता प्रशासनाने कठोर निर्णय घेण्याचे ठरविले आहे. यात पेट्रोल, डीझेल विक्री मधून शेती, प्रक्रिया उद्योग, जीवनावश्यक मालाची वाहतूक, दुध, अत्यावश्यक सेवा देणारे कर्मचारी, अधिकाऱ्यांना वगळण्यात आले आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments