Hot Posts

6/recent/ticker-posts

रणजितदादांकडून तालुक्यातील नागरीकांच्या अडीअडचणी बाबत विचारपूस...

रणजितदादांकडून तालुक्यातील नागरीकांच्या अडीअडचणी बाबत विचारपूस... 


अकलूज( प्रतिनिधी ) - राज्यसभेचे माजी खासदार व श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन रणजितसिंह मोहिते पाटील यांनी कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर माळशिरस तालुक्यातील नागरीकांच्या अडीअडचणीबाबत विचारपूस सुरु केल्याने तालुक्यातील नागरीकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे . 
जागतीक पातळीवर कोरोना व्हायरसमुळे लोक जीव मुठीत घेवून घरातच कैद झाले आहेत . कोरोना व्हायरसच्या दररोजच्या बातम्या ऐकून व पाहून नागरीकांचे धाबे दणाणले आहे . कधी काय होइल याचा सध्या तरी नेम नसल्याने तसेच रोज नवी अफवा पसरत असल्याने लोकांमध्ये भयाचे वातावरण पसरले आहे . 
                  या कोरोना व्हायरसचा मोठा फटका व्यापारी , उद्योजक , शेतकरी व हातावर पोट असणाऱ्या रोजंदारी कामगारांना बसू लागला आहे . व्यापारी व उद्योजक यांनी आपले व्यवहार व उत्पादन बंद ठेवले असून त्यामुळे त्यांची उपासमारी मात्र होणार नसली तरी भांडवली गुंतवणूक व बॅंकाचे कर्ज हा त्यांच्या समोरील मोठा प्रश्न आहे . तो कसा सोडवायचा हा मोठा प्रश्न त्यांच्या समोर आहे . 
शेतकरी वर्ग हा मागील महिन्यात २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ झाल्याने काही अंशी सुखावला होता . आता त्याच्यापुढे कोरोनाचे नवे संकट उभे राहिले आहे . सद्या मोठ्या प्रमाणात भाजीपाला , फळभाज्या तयार आहेत . पण कोरोनामुळे मार्केट बंद असल्याने तयार माल विकायचा कोठे हा मोठा प्रश्न आहे . गावचे आठवडा बाजार बंद झाले आहेत . दळणवळण ठप्प झाले आहे . या पार्श्वभूमीवर तयार मालाचे करायचे काय हा प्रश्न निर्माण झाला आहे . त्यातच चैत्री पाडव्याच्या मुहूर्तावरच अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे . वादळ , वारे , पाऊस असा तिहेरी सामना करीत शेतीमाल वाचविण्याचे मोठे संकट त्यांच्या समोर उभे राहिले आहे . 
सध्या विज , पाणी , अन्नधान्य या मुलभूत गरजा शासनाने पुरवाव्यात अशी मागणी करणारे पत्रच माजी खासदार मोहिते पाटील यांनी प्रशासनाला दिले आहे . विरोधासाठी विरोध ही भूमिका न घेता सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी मोहिते पाटील यांनी उचललेले पाऊल महत्वाचे मानले जात आहे . 
                   माजी खासदार मोहिते पाटील यांनी मिलिंद शंभरकर साहेब, जिल्हाधिकारी,सोलापूर , मनोज पाटील साहेब, पोलीस अधिक्षक,  सोलापुर,  दिपक तावरे साहेब, आयुक्त ,सोलापूर महानगरपालिका, अंकुश शिंदे साहेब, पोलीस आयुक्त, सोलापूर यांना तातडीने पत्रव्यवहार करुन संचारबंदी काळात लोकांना मदत करण्याचे आवाहन केले आहे . 

मोहिते पाटील यांनी केलेल्या मागण्या
 कोरोनाच्या संकटामुळे संचारबंदीच्या काळात नागरिकांना अत्यावश्यक सेवा सुविधा  मिळण्यासंदर्भात खालील उपाययोजनांची  गरज आहे.त्यासंदर्भात  तातडीने निर्णय व्हावेत अशी विनंती आहे.... 
१ )शेतकऱ्यांचा शेतमाल गरजेच्या ठिकाणी  व जिल्ह्याबाहेर पोहोचवण्यासाठी  परवानायुक्त वाहतूक व्यवस्था  उभी करावी .
२ )उन्हाळ्यात ट्रांसफार्मर जळण्याचे प्रमाण जास्त असते. अखंडित वीज पुरवठा सुरू राहण्यासाठी ट्रांसफार्मर भरणाऱ्या व बनवणाऱ्या कंपन्या सुरू राहाव्यात.
३ )घरपोच शुद्ध पिण्याचे पाणी पोहोच करणाऱ्या व्यवस्था नित्य सुरु राहाव्यात.
४ )जीवनावश्यक वस्तू तथा खाद्यपदार्थांचा तुटवडा होता कामा नये.
५ )भाजी मंडई मधील गर्दी टाळण्यासाठी हात गाडीवरून भाजीपाला विक्रीसाठी परवानगी असावी.
६ )आपत्कालीन परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तंबू बनवणाऱ्या कारखान्यांकडून अतिरिक्त तंबू बनवून घ्यावेत जे गरजेनुसार राज्यभर पुरवता येतील.
७ )आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी सोयीच्या इमारती, वसतिगृहे, व मठ यांची पडताळणी करून ठेवावी.
८ )सेवानिवृत्त झालेले सरकारी वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांना सेवेसाठी सज्ज ठेवावे.
९ )शिक्का मारलेल्या संशयित व्यक्ती बाहेर पडणार नाही त्यासंदर्भात दक्षता राहावी.
Reactions

Post a Comment

0 Comments