Hot Posts

6/recent/ticker-posts

वीरशैव व्हीजन महिला आघाडीतर्फे होम मिनिस्टर स्पर्धा उत्साहात

वीरशैव व्हीजन महिला आघाडीतर्फे होम मिनिस्टर स्पर्धा उत्साहात


सोलापूर : वीरशैव व्हीजन महिला आघाडीतर्फे महिला दिनानिमित्त वीरशैव समाजातील महिलांसाठी रविवारी सायंकाळी आयोजित केलेल्या होम मिनिस्टर स्पर्धेत सोनाली लंगरे या सोन्याची नथ व पैठणीच्या मानकरी ठरल्या. पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस,  महापौर श्रीकांचना यन्नम, माजी महापौर शोभा बनशेट्टी, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. मंजिरी चितळे, महिला अध्यक्षा वर्षा काशेट्टी, सचिवा माधुरी बिराजदार यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्‌घाटन करण्यात आले. होम मिनिस्टर स्पर्धेत 180 महिलांनी सहभाग घेतला होता. धरित्री विद्यालयाच्या मुख्याध्यापिका तथा कै. बी. ई. चनशेट्टी गुरुजी प्रतिष्ठानच्या सचिवा संगीता चनशेट्टी यांनी स्पर्धेचे संचालन केले. बॉल पासिंग,  ग्रुप राऊंड पळणे,  टिकल्या लावणे, प्रश्नमंजुषा आदी खेळ खेळण्यात आले. यात स्पर्धक महिलांनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला. काही महिला खेळाचा आनंद लुटत नृत्यही करत होत्या. सलग तीन तास ही स्पर्धा चालली. स्पर्धकांचा सहभाग शेवटपर्यंत टिकून होता हे विशेष. या स्पर्धेतील सात विजेत्यांना सराफ व्यापारी शारदा कुंभारीकर, स्वीटी करजगीकर, साड्यांचे व्यापारी आम्रपाली कोनापुरे व शिवलीला वाले यांच्या उपस्थितीत सोन्याचे दागिने व साड्या देण्यात आल्या. तसेच सहभागी स्पर्धकांना भेटवस्तू व डिस्काऊंट कुपन देण्यात आले. यावेळी वीरशैव व्हीजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले, उत्सव समिती अध्यक्ष सोमेश्वर याबाजी, युवक अध्यक्ष विजयकुमार हेले, उपाध्यक्षा आशा पाटील, सचिवा माधुरी बिराजदार, कार्याध्यक्षा रेणुका सर्जे, कोषाध्यक्ष ज्योती शेटे, सहसचिवा पल्लवी हुमनाबादकर, प्रसिद्धीप्रमुख सुचित्रा बिराजदार आदी उपस्थित होते. वीरशैव व्हीजन महिला आघाडीच्या अध्यक्षा वर्षा काशेट्टी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी अरुधंती शेटे यांनी सूत्रसंचालन केले. सहकोषाध्यक्षा राजश्री गोटे यांनी आभार मानले.  स्पर्धेचा निकाल असा :  द्वितीय : किर्ती स्वामी ,तृतीय : अमृता जवळगे ,चौथा : कविता चिट्टे ,पाचवा : मोहीनी कस्तुरे ,सहावा : श्रद्धा कळके ,सातवा : रत्नप्रभा चिलगुंडे
Reactions

Post a Comment

0 Comments