Hot Posts

6/recent/ticker-posts

कला व विज्ञान महाविद्यालयात महिला दिन उत्साहात साजरा....



पुरुषप्रधान संस्कृतीने महिलां विषयी आपला दृष्टीकोन बदलावा....
   -प्राचार्य ,डॉ. विजयकुमार पाटील.
  

आटपाडी: (प्रतिनिधीविद्यार्थ्यांबरोबरच समाज व्यवस्थेमधील पुरुष प्रधान संस्कृतीने  महिलांकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलला तर सामाजिक परिवर्तन होण्यास फार वेळ लागणार नाही. असे प्रतिपादन कला व विज्ञान महाविद्यालय आटपाडी चे प्राचार्य, डॉ. विजयकुमार पाटील यांनी महिला दिनाच्या निमित्ताने महाविद्यालयामध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात केले. समाजातील विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या स्त्रियांकडे आणि महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थिनीच्या कडे समाज व्यवस्थेमधील पुरुष व विद्यार्थ्यांनी महिलांच्या कडे आणि विद्यार्थिनी कडे बघण्याचा आपला दृष्टिकोन  बदलून   आपली माता-भगिनी समजून त्यांच्याशी आपण जीवन व्यवहार केल्यास त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचारांचे प्रमाण निश्‍चितच कमी होऊन सामाजिक परिवर्तनाला अधिकाधिक गती मिळेल. त्यांचे कुठल्याही प्रकारे शोषण होणार नाही .असे मत प्राचार्य, डॉ. विजयकुमार पाटील यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या वेळी महिला दिनाच्या निमित्ताने महाविद्यालयामध्ये आयोजित केलेल्या चर्चासत्रामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या चर्चासत्रामध्ये प्रा. डॉ. रामदास नाईकनवरे ,प्रा.  बालाजी वाघमोडे, प्रा.आप्पासाहेब हातेकर, प्रा. निकम मॅडम, देशमुखे मॅडम यांनी चर्चेत चर्चक म्हणून सहभाग घेतला होता. या सर्व चर्चासत्रातील चर्चकानी आपापली मते व्यक्त केली. या कार्यक्रमाच्या वेळी विद्यार्थी-विद्यार्थिनी, सर्व शिक्षक स्टाफ उपस्थित होता. या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून करण्यात आली. त्यानंतर प्राचार्य, डॉ. विजयकुमार पाटील यांच्याबरोबरच उपस्थित मान्यवरांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रा. वाघमोडे सर यांनी केले. तर आभार प्रा. डॉ. रामदास नाईकनवरे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी मारुती हेगडे यांनी सहकार्य केले.....
Reactions

Post a Comment

0 Comments