Hot Posts

6/recent/ticker-posts

श्री क्षेत्र आनंदी गणेश येथे धार्मिक कार्यक्रम

श्री क्षेत्र आनंदी गणेश येथे धार्मिक कार्यक्रम

अकलूज ( प्रतिनिधी) श्री क्षेत्र आनंदी गणेश सेवाभावी संस्था आनंद नगर अकलूज याठिकाणी गणेश जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम  घेण्यात आले आहे.  सकाळच्या सत्रामध्ये स. 8:00 वाजता - महाभिषेक स्वयंप्रभादेवी उदयसिंह मोहिते- पाटील व शिवतेजसिंह उदयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते घेण्यात आला. त्यानंतर  मंगळवेढा  महिला भजनी मंडळाकडून भजन सादर करण्यात आले. कु. प्रियंका ठाकूर यांचे गणेश कथेवर प्रवचन व भक्तिमय भजनाचा कार्यक्रम सादर झाला. श्रीं ची मिरवणूक (दिंडी) काढण्यात आली त्यामध्ये शेकडो भाविकांनी सहभाग घेतला. श्री. वरती पुष्पवृष्टी केल्यानंतर स्वयंप्रभादेवी  उदयसिंह मोहिते पाटील,  ईश्वरीदेवी किर्तीध्वजसिंह मोहिते पाटील,  कु. प्रियंका ठाकूर व शेकडो महिलांच्या उपस्थितीत श्रीं चा पाळणा घेण्यात आला. व श्री आनंदी गणेशाची महाआरती व महानैवेद्य दाखविण्यात आला. व त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले याचा दर्शनास आलेल्या सर्व गणेश भक्तांनी व श्री आनंदी गणेशास आलेल्या शैक्षणिक सहलीतील विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. दुपारच्या सत्रात सायं. 5:00 ते 7:00 वा. -या वेळात स्वयंप्रभादेवी उदयसिंह मोहिते पाटील  यांच्या मार्गदर्शनाखाली  शेकडो महिलांनी एकत्र येऊन अथर्वशीर्षाचे पठण केले . गणेश जयंतीच्या निमित्ताने श्री आनंदी गणेशा चे विजयसिंह शंकरराव मोहिते पाटील माजी उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांनी दर्शन घेऊन सुरू असलेल्या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाची सांगता करताना सौ. ईश्वरीदेवी किर्तीध्वजसिंह मोहिते पाटील यांनी आलेल्या मान्यवरांचे व सर्व गणेश भक्तांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमासाठी राजेंद्र घोरपडे, शिवाजी तुपे, शेळके, वैशाली कांडलकर, वैशाली कुलकर्णी, हनुमंत घाडगे, बापुराव भिंगारदिवे, राहुल बोबडे, प्रकाश गायकवाड, अनिल उघडे, भारतराजे भोसले व शिवकिर्ती युवा मंचाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments