Hot Posts

6/recent/ticker-posts

हॅपी डेज इंटरनॅशनल व हॅप्पी डे स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन

हॅपी डेज इंटरनॅशनल व हॅप्पी डे स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन
सोलापूर-  दिनांक 8 जानेवारी 2020 बुधवार रोजी हॅपी डेज इंटरनॅशनल व हॅप्पी डे स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा जल्लोषात संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे निवृत्त इंडियन नेव्ही कमांडर कैलास गिरवलकर यांच्या हस्ते श्री गणेश ची पूजा व दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यावेळी संस्थेचे चेअरमन महेश कुमार नक्का, संस्थेचे विश्वस्त निखिल गोगी, किरण नक्का, हॅपी डेज इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका वैशाली साबळे मॅडम, हॅपी डेज स्कूलचे प्रमुख अर्चना तांदळे मॅडम शाळेची, व्यवस्थापक नयन मंगलपल्ली सर आदी उपस्थित होते.वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी सूत्रसंचालन व विविध कलागुणांचे प्रदर्शन कर्नाटक, आसाम, महाराष्ट्र, तेलंगाना, गोवा, मिझोराम, पंजाबी, केरळ, भरतनाट्यम, कश्मीर, रशियन, अरेबियन, आफ्रिकन, जपानी, नेपाली, या गाण्यांवर केले. व वसुदै व कुटुम्बकम विश्व संस्कृती विश्व हेच माझे घर त्यांचे महत्त्व पटवून दिले. तसेच विद्यार्थ्यांना स्टुडन्ट ऑफ द इयर विशेष प्रयत्नशील जूनियर डॉ अब्दुल कलाम सायंटिस्ट अभ्यास व गुणवंत विद्यार्थी अशी पारितोषिक देऊन विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे मुख्य सूत्रसंचालन शिक्षिका शुभदा माडेकर व प्रीती कडदेवरमठ यांनी केले. कार्यक्रमाचे आभार विद्यार्थिनी कुमारी अखिलेशवरी नक्का त्यांनी केली. कार्यक्रम यशस्वी व उत्साहात संपन्न होण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षके तर कर्मचाऱ्यांनी कठोर परिश्रम घेतले. कार्यक्रमाची संगता वंदे मातरम या गीताने झाली.
Reactions

Post a Comment

0 Comments