93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील कविकट्यात प्रा डॉ शिवाजी शिंदे यांच्या कवितेस श्रोत्यांनी दिली भरभरून साथ.

सांगोला (प्रतिनिधी) ; आज दिनांक ११जानेवारी २०२० रोजी ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, संत गोरोबाकाका नगरी,उस्मानाबाद येथे मला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा " मराठी भाषा दक्षता अधिकारी " या नात्याने विशेष अमंत्रित म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे.साहित्य संमेलनात आज सकाळी मी " कविकट्टा " या कवी संमेलनाच्या व्यासपीठावर माझी " तुम्ही येणार आहात म्हणून " ही कविता सादर केली......
तुम्ही येणार आहात म्हणून......
तुमच्या येण्याची आपल्या
चिमुरड्यांना आस होती,
तुमच्या समवेत काही काळ
रमण्याची त्यांची इच्छा होती,
तुम्ही येणार म्हटल्यावर,
चेहरे त्यांचे हसरे व्हायचे,
आई ,नक्की येणार ना गं, बाबा
अशी आर्त हाक मला द्यायचे,
तुम्ही आल्यानंतर आम्ही,
खरेदीसाठी जाणार होतो
आपल्या चिमुरडीचा वाढदिवस
तुमच्या सोबत करणार होतो,
आज तुम्ही येताय
भारतमातेसाठी शहीद होऊन
मी त्यांना कसं सांगू,
तुम्ही या जगात नाहीत म्हणून
सगळं कसं राहिलं हो
जागच्या जागी थांबून
चिमुरड्यांची स्वप्ने आपल्या
गेली धुळीस मिळून
खूप आनंदी होती हो
आपुली चिमुरडी
तुम्ही येणार आहात म्हणून....
तुम्ही येणार आहात म्हणून.....
काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात आपल्या भारतीय जवानांवर दहशदवादी भ्याड हल्ला झाला, त्या शहीद पत्नीची अवस्था कशी असेल याची कल्पना मी या कवितेतून मांडली आहे......
यावेळी व्यासपीठावर कविकट्टा प्रमुख तथा विश्वस्थ अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळ मा. राजन लाखे सर, सदस्य श्रीमती तनुजा ढेरे मॅडम, सदस्य अविनाश हंगरगेकर सर यांची प्रमुख उपस्थिती होती.९३ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनास उपस्थित राहण्याची संधी मला देणाऱ्या,ज्या नेहमीच चांगल्या कार्यास प्रेरणा देत असतात अशा आमच्या मार्गदर्शिका, विद्यापीठाच्या सन्माननीय कुलगुरू,आदरणीय डॉ. मृणालिनी फडणवीस मॅडम यांचा मी मनापासून ऋणी आहे. तसेच विद्यापीठाचे प्रभारी प्र-कुलगुरू आदरणीय डॉ. विकास कदम सर,विद्यापीठाचे कुलसचिव आदरणीय डॉ. विकास घुटे सर, विद्यापीठाचे वित्त व लेखाधिकारी तथा प्रभारी संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ,आदरणीय सीए.श्रेणिक शाह सर यांचेही मी मनापासून आभार मानतो..

0 Comments