आंतरराष्र्टीय जिजाऊ जन्मोत्सवासाठी सोलापुर जिल्ह्यातुन जाणार हजारो जिजाऊ भक्त
सोलापूर - दि. १२ जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ जन्मोत्सवा निमित्त विदर्भातील बुलढाणा जिल्हयातिल लखोजीराजे जाधव यांच्या सिंदखेडराजा येथिल एतिहासिक राजवाड्यावर व अंतरराष्ट्रीय शिवधर्मपिठावर जगभरातिल जिजाऊ भक्त लाखोंच्या संख्येनी एकत्र येऊन राजमाता जिजाऊंना अभिवादन करतात. दिवसभरामधे प्रबोधनाच्या वैविध्यपुर्ण कार्यक्रमांचे आयोजन केलेले असते. सोबतच करोड रुपये किमतीच्या पुस्तकांची उलाढाल होते. ज्या मातेने दोन महान छत्रपती घडविले अशा मातेच्या पावन भूमित जाऊन विचारांची मेजवानी घेऊन जिजाऊ भक्त अत्यंत आदराने नतमस्तक होतात. यावेळी "मराठा भुषण" व "जिजाऊ पुरस्कारांनी" मान्यवरांना सन्मानित केले जाते अनेकांना त्यातुन प्रेरणा मिळते अशा या ऐतिहासिक मोहत्सवासाठी सोलापुर जिल्हा व परीसरातुनही हजारोंच्या संख्येनी जिजाऊभक्त जाणार आहेत. मराठा सेवा संघ जालन्याच्यावतीने दि. ११ रोजी रात्री भोजन व निवास व्यवस्था करण्यात आली आहे. आपणही या ऐतिहासिक सोहळयाचे साक्षिदार होऊन या उत्सवासाठी यावे असे आवाहन मराठा सेवा संघाचे जिल्हा अध्यक्ष प्रशांत पाटील , कार्याध्यक्ष तानाजी चटके, प्रा संजय जाधव, सोमनाथ राऊत, निर्मलाताई शेळवणे, नंदाताई शिंदे, यांनी केले आहे .

0 Comments