राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद यांना जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन
सोलापूर [ प्रतिनिधी ] - राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांना आज जिल्हा प्रशासनातर्फे जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुउद्देशीय सभागृहात झालेल्या कार्यक्रमात निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख, प्रांताधिकारी शमा ढोक पवार आणि राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक रवींद्र आवळे यांनी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकांनद यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी जिल्हाधिकारी व जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयातील अधिकारी -कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments