Hot Posts

6/recent/ticker-posts

माजी सैनिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन संवेदनशील - जिल्हाधिकारी डॉ. भोसले


माजी सैनिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन संवेदनशील - जिल्हाधिकारी डॉ. भोसले
  सोलापूर, दि. 11:- माजी सैनिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन संवेदनशील आहे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी आज येथे केले.जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत आज माजी सैनिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले बोलत होते. यावेळी माजी सैनिकांना स्वयंरोजगारासाठी विविध योजनांतून तसेच सानुग्रह अनुदानाचे वाटप करण्यात आले.

            कार्यक्रमास पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवृत्त मेजर एस.एस. खांडेकर, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अजित देशमुख आदी उपस्थित होते.

            जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले, सैन्य दलाच्या बळावरच आपल्या देशाची एकात्मता व अखंडता टिकुन आहे. सैन्य दलाचे देशसेवेत नेहमीच अतुलनीय योगदान राहीले आहे. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात नुकत्याच आलेल्या पुर परिस्थितीतही सैन्य दलाने बजावलेली कामगिरी अतुलनीय होती. माजी सैनिकांच्या समस्या, प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासन नेहमीच संवेदनशील व सकारात्मक राहील अशी ग्वाही जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली.

            यावेळी माजी सैनिकांना धनादेशाचे वितरण करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा सैनिक कार्यालयातील अनिलकुमार मेंगशेटृटी, संजीव काशीद, सतीश रासकर, गुरुनाथ कुलकर्णी, दिनेश नागणे, शमीर आरकाटे, बु.अ.शिसोदे, चंद्रकांत साळुंके, एम.यु. मुल्ला, राजेसाहेब शेख, श्रीमती आशादेवी किवडे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानद कॅप्टन मार्तंड दाभाडे तर आभार प्रदर्शन निवासी उपजिल्हाधिकारी तथ जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अजित देशमुख यांनी केले.
Reactions

Post a Comment

0 Comments