
विशेष सीबीआय न्यायाधीश लोया हे सोहराबुद्दीन बनावट एन्काऊंटरच्या खटल्याची सुनावणी करत होते. या खटल्यात भाजप अध्यक्ष अमित शाहा आरोपी होते.
1 डिसेंबर 2014 रोजी लोया आपल्या सहकाऱ्याच्या मुलीच्या लग्नासाठी नागपूरला गेले. तिथं त्यांचा मृत्यू झाला. पण कॅराव्हान मॅगेझिननं 4 महिन्यांपूर्वी लोयांचा मृत्यू संशयास्पद असल्याची बातमी दिली होती. त्यानंतर देशभर खळबळ उडाली.
न्या. लोया यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी होणार नाही, हे सांगतानाच, सुप्रीम कोर्टाने जनहित याचिकेचा गैरवापर होत असल्याचं नमूद केलं.न्यायमूर्ती लोयांसोबत जे न्यायाधीश प्रवास करत होते, त्यांच्यावर संशय व्यक्त करु शकत नाही. ज्या पद्धतीने जनहित याचिकांचा राजकीय वापर होत आहे, ते पाहता हा न्यायपालिकांच्या बदनामीचा प्रयत्न आहे, असं न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी नमूद केलं.
0 Comments