पंढरपूर येथे शनिवारी 'महात्मा फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार' वितरण सोहळा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, November 27, 2026

पंढरपूर येथे शनिवारी 'महात्मा फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार' वितरण सोहळा

 पंढरपूर येथे शनिवारी 'महात्मा फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार' वितरण सोहळा




पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- मराठा सेवा संघ आणि डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद (पंढरपूर) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'तालुकास्तरीय महात्मा फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार' व 'कर्मवीर भाऊराव पाटील उपक्रमशील शाळा पुरस्कार' जाहीर झाल्याची माहिती मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष नितीन जाधव यांनी दिली. पुरस्कार वितरण समारंभ शनिवार, दि. २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६:३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा येथील प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था सभागृहात संपन्न होणार आहे.
 यंदा या उपक्रमाचे सलग २१ वे वर्ष आहे. पुरस्काराचे मानकरी पुढीलप्रमाणे - मंगल जगदाळे( अंगणवाडी क्र 18 मानवाडी), दादा गायकवाड (जि. प. प्रा. शाळा, सिद्धेवाडी), तानाजी क्षीरसागर (जि. प.प्रा. शा. बाबर नगर), हनुमंत पवार (जि. प.प्रा. शाळा चौफाळवस्ती), नीता धुमाळ (आदर्श प्राथमिक विद्यालय, पंढरपूर), कुमरे आनंदराव (न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज गादेगाव), सत्यवान नकाते( कर्मवीर माध्यमिक विद्यालय तारापूर), जयश्री पालसांडे( इंग्लिश स्कूल, आंबे चिंचोली), सोमनाथ नागटिळक (खेडभोसे विद्यालय खेडभोसे), समाधान माने (इंग्रजी विभागप्रमुख, कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय) उपक्रमशील शाळा सतू कृष्णा केणी विद्यालय अनवली हा समारंभ संत कैकाडी महाराज मठाचे शिवश्री भारत जाधव महाराज यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. या सोहळ्याचे पुरस्कार वितरण माजी विधान परिषद सदस्य दत्तात्रय अ. सावंत आणि पंढरपूरच्या नगराध्यक्षा प्रणितीताई भालके यांच्या शुभहस्ते होणार आहे.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सांगलीचे शिक्षक नेते अर्जुनराव पाटील आणि संभाजी ब्रिगेडचे (माढा विभाग) जिल्हा अध्यक्ष आनंद काशिद हे उपस्थित राहणार आहेत. तसेच बाळासाहेब काळे, डॉ. पं. दे. राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे राज्य सचिव सुनिल चव्हाण, संजय जाधव, जीवन यादव, नगरसेविका प्रणिताताई घाडगे आणि जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेच्या पुणे विभागीय अध्यक्षा  सुमनताई पवार यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
या सोहळ्याचे आयोजन मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष नितीन जाधव, डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे तालुकाध्यक्ष हनुमंत भोसले व सर्व पदाधिकाऱ्यांनी केले असून, तरी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages