साहित्य आणि नाट्य क्षेत्रातील प्रवासातून जागतिक विचारविश्वापर्यंत डॉ. दीपक करंजीकर यांचा संवाद - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, November 28, 2026

साहित्य आणि नाट्य क्षेत्रातील प्रवासातून जागतिक विचारविश्वापर्यंत डॉ. दीपक करंजीकर यांचा संवाद

 

साहित्य आणि नाट्य क्षेत्रातील प्रवासातून जागतिक विचारविश्वापर्यंत डॉ. दीपक करंजीकर यांचा संवाद




मुंबई(कटूसत्य वृत्त ):- मुंबई पुस्तक महोत्स २०२६ मध्ये ‘साहित्य आणि नाट्य क्षेत्रातील प्रवास’ या विषयावर प्रसिद्ध लेखक, वक्ते, विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि अभिनेते डॉ. दीपक करंजीकर यांची मुलाखत आयोजित करण्यात वआली. अमेय रानडे यांनी त्यांच्याशी संवाद साधत त्यांच्या साहित्यिक आणि कलाक्षेत्रातील प्रवासाचा वेध घेतला.

या संवादादरम्यान डॉ. करंजीकर यांनी साहित्य, नाट्य, जागतिक राजकारण, आंतरराष्ट्रीय अर्थकारण आणि जागतिक स्तरावरील घडामोडींविषयी आपले विचार मांडले. जागतिक राजकारण आणि पडद्यामागील घडामोडींचे अभ्यासक म्हणून त्यांनी विविध आंतरराष्ट्रीय विषयांवर चर्चा केली.यावेळी त्यांनी चीनच्या पार्श्वभूमीवर आधारित ‘लाल सूत्र’ या आगामी पुस्तकाची माहिती दिली. तसेच पुढील दोन वर्षांत आपली चार ते पाच पुस्तके वाचकांच्या भेटीला येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

संवादाच्या समारोपप्रसंगी अमेय रानडे यांनी डॉ. करंजीकर यांच्या कला आणि साहित्य क्षेत्रातील प्रवासाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. त्यांचा हा प्रवास पुढील काळातही सुरू राहील, अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांच्या नियोजित साहित्यकृती, काव्यलेखन आणि नाट्यकृतींची वाचकांना प्रतीक्षा असल्याचे सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages