रेणुका माता मंदिरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम, गरबा-दांडिया उत्सवाची जय्यत तयारी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, October 14, 2026

रेणुका माता मंदिरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम, गरबा-दांडिया उत्सवाची जय्यत तयारी

 रेणुका माता मंदिरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम, गरबा-दांडिया उत्सवाची जय्यत तयारी 




नातेपुते (कटूसत्य वृत्त):- नातेपुते येथील कोटातील आई म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री रेणुका माता मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच
नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या गरबा-दांडिया उत्सवाची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे.दिनांक ११ ऑक्टोबर ते १८ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत हा नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असून, महिला भगिनींसाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत ..
नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी रविवारी, ११ ऑक्टोबर रोजी घटस्थापनेने उत्सवाचा प्रारंभ झाला. त्यानंतर दररोज सायंकाळी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये दांडिया, कुंकुमार्चन, होम मिनिस्टर, जागर स्त्रीशक्तीचा आदी कार्यक्रमांचा समावेश आहे. प्रत्येक दिवसासाठी विशिष्ट रंगाची संकल्पना निश्चित करण्यात आली असून, त्या रंगानुसार महिलांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
‘खेळ रंगला नवरात्रीचा’ गरबा-दांडिया उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी सौभाग्यवती दीपाली शत्रुघ्न गायकवाड-राऊत यांची प्रमुख उपस्थिती लाभली. नवरात्रोत्सवाच्या उत्साहात महिला भगिनींना सहभागी होता यावे, तसेच पारंपरिक गरबा आणि दांडियाच्या माध्यमातून आनंद, उत्साह आणि सांस्कृतिक एकात्मतेचा अनुभव घेता यावा, हा या कार्यक्रमामागील उद्देश आहे.गरबा-दांडिया हा नवरात्रोत्सवातील महिलांच्या उत्साहाचा आणि सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलांना एकत्र येण्याची, आपल्या कलागुणांना वाव देण्याची आणि भक्तिमय वातावरणात आनंद साजरा करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.या सर्व कार्यक्रमांमुळे नवरात्रोत्सवात धार्मिक वातावरणाबरोबरच महिला सक्षमीकरण, सांस्कृतिक जतन आणि सामाजिक एकोपा यांना प्रोत्साहन मिळणार आहे. त्यामुळे सदर होणाऱ्या सर्व कार्यक्रमास महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजक समिती व रेणुका परिवार, नातेपुते यांच्या वतीने करण्यात आले आहे.

चौकटीत :
नवरात्र उत्सवानिमित्त होणारे विविध कार्यक्रम
बुधवार, १४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ८ वाजता दांडिया, गुरुवार, १५ ऑक्टोबर रोजी कुंकुमार्चन, शुक्रवार, १६ ऑक्टोबर रोजी होम मिनिस्टर, शनिवार, १७ ऑक्टोबर रोजी दांडिया, तर रविवार, १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ८ वाजता ‘जागर स्त्रीशक्तीचा’ हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages