सांगोला विधानसभा मतदारसंघात शिक्षक व पदवीधर निवडणुकीसाठी भाजपची जोरदार तयारी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, October 19, 2026

सांगोला विधानसभा मतदारसंघात शिक्षक व पदवीधर निवडणुकीसाठी भाजपची जोरदार तयारी

 सांगोला विधानसभा मतदारसंघात शिक्षक व पदवीधर निवडणुकीसाठी भाजपची जोरदार तयारी 





सांगोला (कटूसत्य वृत्त):- पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या आदेशानुसार व सभापती चेतनसिंह केदार सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगोला विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीच्या वतीने नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक २५ मतदारांमागे दोन कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्यात आली असून, मतदारांशी संपर्क साधण्यासाठी पक्ष संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.

सांगोला विधानसभा मतदारसंघात पदवीधर मतदारांची संख्या ५,००८, तर शिक्षक मतदारांची संख्या २,०७७ आहे. यापैकी पदवीधर मतदारसंघातील २,१७१ मतदारांची नोंदणी आपल्या प्रयत्नांतून झाल्याचे सभापती चेतनसिंह केदार सावंत यांनी सांगितले.
शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सांगोला विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांची बैठक हॉटेल ज्योतिर्लिंग, वाढेगाव नाका, सांगोला येथे सांगोला विधानसभा प्रभारी मा.आमदार राजेश पाडवी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व सभापती चेतनसिंह केदार सावंत यांच्या प्रमुख उपस्थित पार पडली. या बैठकीत निवडणुकीच्या नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली. 
    पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार सौ. स्मिता जाधव आणि शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार मा. श्री. कौस्तुभ गावडे यांना सांगोला विधानसभा मतदारसंघातून मोठी आघाडी मिळवून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन करण्यात आले.
सांगोला विधानसभा मतदारसंघातील भाजपची संघटनात्मक यंत्रणा सक्रिय झाली असून, शिक्षक व पदवीधर मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक मतदाराशी संपर्क साधणे, कार्यकर्त्यांमध्ये समन्वय राखणे आणि निवडणुकीच्या कामाला गती देणे यावर भर दिला जात आहे.

     आगामी शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत दोन्ही उमेदवारांना भरघोस मताधिक्य मिळवून देण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते एकजुटीने प्रयत्न करतील, असा विश्वास सभापती चेतनसिंह केदार सावंत यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस सचिन शिंदे, बाळासाहेब एरंडे, शिवाजीराव गायकवाड, बाळासाहेब काटकर, गजानन भाकरे, नगरसेवक CA जुबेर मुजावर, मंडल अध्यक्ष दुर्योधन हिप्परकर, मंडल अध्यक्ष विजय मगर, मंडल अध्यक्ष दादासाहेब खरात, सभापती पुनमताई इंगोले, रोहिणीताई पाटील-शेंडे, नगरसेविका तनुजाताई एरंडे, नगरसेविका वैशाली झपके, संगीताताई चौगुले, निवास येलपले सर, नवत्रे सर इ आदी मान्यवर भाजपा प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages