शिक्षण क्षेत्रातील प्रश्न सोडविण्यासाठी सत्ताधारी आमदाराची गरज- राजन पाटील - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, October 19, 2026

शिक्षण क्षेत्रातील प्रश्न सोडविण्यासाठी सत्ताधारी आमदाराची गरज- राजन पाटील

शिक्षण क्षेत्रातील प्रश्न सोडविण्यासाठी सत्ताधारी आमदाराची गरज- राजन पाटील




अनगर (कटूसत्य वृत्त):- पुणे शिक्षक मतदारसंघातील भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार कौस्तुभ गावडे आणि पदवीधर मतदारसंघातील उमेदवार डॉ. स्मिता जाधव यांच्या प्रचारार्थ अनगर येथे आयोजित शिक्षक मेळाव्यास मोहोळ तालुक्यातील शिक्षक व शिक्षिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष तथा माजी आमदार राजन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मेळाव्यात राष्ट्रीय शिक्षक मंचाने कौस्तुभ गावडे यांना पाठिंबा जाहीर केला.
भाजपचे निरीक्षक तथा धुळे येथील माजी आमदार कुणाल पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शिक्षण क्षेत्रातील धोरणात्मक निर्णय आणि शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सत्ताधारी पक्षाचा आमदार असणे आवश्यक आहे. शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासह शिक्षण क्षेत्रातील अडचणी दूर करण्यासाठी कौस्तुभ गावडे यांना प्रथम पसंतीचे मत द्यावे, असे आवाहन राजन पाटील यांनी केले.

शिक्षक हा शिक्षण व्यवस्थेचा कणा असून त्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन ते सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक आहे. शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न, सेवाविषयक अडचणी आणि शिक्षण क्षेत्रातील विविध समस्या सोडविण्यासाठी कौस्तुभ गावडे सक्षमपणे काम करतील. शिक्षकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू, अशी ग्वाही माजी आमदार कुणाल पाटील यांनी दिली.
श्री अनगरसिद्ध शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत ढोले यांनी प्रास्ताविक केले. सत्यवान दाढे यांनी सूत्रसंचालन केले, तर रामचंद्र पाटील यांनी आभार मानले.
या मेळाव्यास मोहोळ तालुका भाजपाध्यक्ष प्रकाश चवरे, सतीश आप्पा काळे, हनुमान बाप्पा पोटरे, प्रमोद आवताडे, प्राचार्य महादेव चोपडे, श्रीधर उन्हाळे, भिकाजी कुलकर्णी, शरद म्हमाने, माजी प्राचार्य सुधीर गायकवाड, प्राचार्य संतोष गायकवाड, मुख्याध्यापक विश्वजीत देशमुख यांच्यासह तालुक्यातील शिक्षक, शिक्षिका आणि विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages