तडवळे येथे महावितराण्याचा विरोधात रास्ता रोको आंदोलन
कसबे तडवळे (कटूसत्य वृत्त):- धाराशिव तालुक्यातील कसबे तडवळे हे राज्यात शिक्षणाच्या बाबतीत गाजलेले तडवळा पॅटर्न म्हणून ओळखले जाणारे एक मेव गाव असून गावातील दर साल किमान एक डझन तरी विद्यार्थी नवोदय परीक्षा पात्र ठरतात. या गावाला वेठीस धरून जवळपास 50 दिवस झाले गावात सायंकाळी 6 च्या दरम्यान लाईट जाते ते सायंकाळी आठ नऊ वाजेच्या सुमारास येते. तडवळे सब स्टेशन वरती दोन दिवसा पूर्वी कुलूप लावून निषेध व्यक्त करून पण काही फरक न पडल्याने गावकरी रस्त्यावर उतरले. एक तास रास्ता रोको आंदोलन करून प्रशासन,शासनाचा निषेध करण्यात आला.निसर्गाने साथ सोडली वरून महावितरण,शासन आम्हाला मुद्दाम वेठीस धरून गावातील नागरिकांना हकनाक त्रास देत आहे आहे असे आंदोलकांचे म्हणणे आहे.गावाला लाईट सुविधा व्यवस्थित उपलब्ध करून देण्यात यावी तसेच पुढील काळात असेच चालत राहिले तर अजून आम्ही आंदोलने त्रिव करू असे आवाहन ग्रामपंचायत सदस्य सुभाष धनके यांनी केले आहे. या वेळी उपसरपंच हरून शेख,सदस्य धनाजी होगले,राजाभाऊ लोंढे,विशाल जमाले यांनी अमर शेख,उपकार्यकारी अभियंता तेर विभाग,श्याम जाधव
सहाय्यक अभियंता धाराशिव यांना निवेदन दिले.या वेळी दोन्ही बाजूला वाहनाच्या रांगाचं रांगा लागल्या होत्या.या आंदोलनाला गावातील मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.
.jpg)

No comments:
Post a Comment