कर्जमुक्तीच्या तिसऱ्या टप्प्यात ३ लाख २७ हजार २५० शेतकऱ्यांना ३ हजार १६० कोटी ४३ लाख रुपयांचा लाभ - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, October 2, 2026

कर्जमुक्तीच्या तिसऱ्या टप्प्यात ३ लाख २७ हजार २५० शेतकऱ्यांना ३ हजार १६० कोटी ४३ लाख रुपयांचा लाभ

 

कर्जमुक्तीच्या तिसऱ्या टप्प्यात ३ लाख २७ हजार २५० शेतकऱ्यांना ३ हजार १६० कोटी ४३ लाख रुपयांचा लाभ




मुंबई(कटूसत्य वृत्त):-  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६च्या तिसऱ्या टप्प्यात राज्यातील ३ लाख २७ हजार २५० पात्र शेतकऱ्यांना ३ हजार १६० कोटी ४३ लाख रुपयांच्या कर्जमुक्ती लाभाचे वितरण सुरू करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित कार्यक्रमात ऑनलाइन पद्धतीने या लाभाचे वितरण करण्यात आले. योजनेच्या पहिल्या टप्प्यात ६ लाख २२ हजार २०७ पात्र शेतकऱ्यांना ५ हजार २९ कोटी रुपयांचा, तर दुसऱ्या टप्प्यात ६ लाख ३६ हजार ३६ पात्र शेतकऱ्यांना ५ हजार ८६ कोटी रुपयांचा कर्जमुक्ती लाभ देण्यात आला आहे.

तिन्ही टप्प्यांत आतापर्यंत राज्यातील एकूण १५ लाख ८५ हजार ४९३ शेतकऱ्यांना १३ हजार २७५ कोटी रुपयांचा कर्जमुक्ती लाभ वितरित करण्यात आला आहे. पात्र शेतकऱ्यांना लाभ वितरणाची प्रक्रिया सुरू असून लाभार्थ्यांची संख्या सातत्याने अद्ययावत करण्यात येत आहे. योजनेची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येत असून मुख्यमंत्री स्तरावरून त्याचे नियंत्रण व देखरेख करण्यात येत आहे.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages