वैद्यकीय सेवा प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या नवीन १०८ रुग्णवाहिकांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली पाहणी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, September 23, 2026

वैद्यकीय सेवा प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या नवीन १०८ रुग्णवाहिकांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली पाहणी

वैद्यकीय सेवा प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या नवीन १०८ रुग्णवाहिकांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली पाहणी

सेवा संकल्प अभियानांतर्गत रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्याचा निर्णय


मुंबई(कटूसत्य वृत्त):-  राज्य शासनाच्या आपत्कालीन वैद्यकीय सेवा प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या नवीन १०८ रुग्णवाहिका लवकरच शासकीय सेवेत दाखल होणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज या रुग्णवाहिकांची पाहणी केली. तसेच त्या लवकरात लवकर शासनाच्या सेवेत दाखल करण्याची प्रक्रिया निश्चित करण्यास सांगितले.

महाराष्ट्र शासनाच्या सेवेत १०८ रुग्णवाहिका सेवेअंतर्गत एकूण १७५६ रुग्णवाहिका दाखल होणार असून त्यातील १२०० रुग्णवाहिका या सर्वसाधारण रुग्णवाहिका असतील, उर्वरित अँडव्हान्स लाइफ सपोर्ट सुविधा उपलब्ध करणार आहेत.

संपूर्ण भारतीय बनावटीच्या या रुग्णवाहिकांमध्ये अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यात ईसीजी, ट्रान्सपोर्ट व्हेंटिलेटर, पल्स ऑक्सिमीटर, सक्शन पंप, ऑक्सिजन वितरण प्रणाली तसेच हॉस्पिटलमधील डॉक्टरांशी थेट संवाद साधण्याची सोयही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या योजनेअंतर्गत १२०४ मूलभूत जीवनरक्षक रुग्णवाहिकांचा समावेश असून त्यात ३६ नवजात बालकांसाठीच्या रुग्णवाहिका, १६६ दुचाकी रुग्णवाहिका, १५ नदी बोट रुग्णवाहिका, १० समुद्री बोट रुग्णवाहिका, उर्वरित अँडव्हान्स लाइफ सपोर्ट सुविधा; अशा एकूण १७५६ रुग्णवाहिकांचा समावेश आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात सेवा संकल्प अभियान सुरू करण्यात आले असून, या अंतर्गत यातील १५० रुग्णवाहिका नागरिकांच्या सेवेत दाखल करण्याचा शासनाचा प्रयत्न असून, त्यासाठी आज उपमुख्यमंत्री शिंदे यांनी या रुग्णवाहिकांची पाहणी करून त्यात उपलब्ध असलेल्या सेवांची माहिती जाणून घेतली. तसेच त्यात काही बदलही सुचवले.

यावेळी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, कुटुंब कल्याण आयुक्त आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक संजय काटकर, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव नवीन सोना, सुमित फेसिलिटीजचे संचालक सुमित साळुंखे आणि सार्वजनिक आरोग्य विभागाचे अनेक अधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages