आरोग्य विज्ञान विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी यांच्या गुणवंत पाल्यांचा सन्मान
नाशिक (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी यांच्या गुणवंत पाल्यांचा सन्मान करण्यात आला. विद्यापीठाचे मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गीते यांच्या हस्ते शालांत परीक्षा, पदवी, पदव्युत्तर, क्रीडा क्षेत्रात विशेष प्राविण्य प्राप्त गुणवंत पाल्यांना स्मृतिचिन्ह, पुस्तक, गुलाब पुष्प व बक्षीसाचा धनादेश देऊन सन्मानित करण्यात आले आहे यावेळी कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू, वित्त व लेखाधिकारी श्री. बोधीकिरण सोनकांबळे, डॉ. नितीन कावेडे उपस्थित होते.
यावेळी विद्यापीठाचे मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गीते यांनी सांगितले की, गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी असे उपक्रम करणे गरजेचे आहे. गुणवंत विद्यार्थ्यांचा केलेला सन्मान अनेकांसाठी प्रेरणादायी असतो. शाळा व महाविद्यालय स्तरावर असे कार्यक्रम सर्वांनीच आयोजित करावेत. विद्यार्याना पुस्तकी ज्ञानासोबतच नवीन तंत्रज्ञान आणि सामाजिक मूल्ये शिकवण्याची गरज आहे. विद्याथ्या्रानो भविष्यात कधी अपयश आलेच तर खचून न जाता दुप्पट वेगाने काम करत रहा. आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या प्रगतीसाठी कसा करता येईल हा दृष्टिकोन ठेवा. प्रत्येक कामासाठी प्रामाणिक प्रयत्न करा आणि स्वतःवर विश्वास ठेवा यश तुमचेच असेल असे त्यांनी सांगितले.
विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी यांच्या गुणवंत पाल्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल त्यांचा विद्यापीठ परिवारातर्फे सन्मान करण्यात आला. याप्रसंगी इयत्ता दहाविच्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी कु. मोरे स्मिता दीपक, कु. शिंदे उत्कर्षा प्रशांत, कु. पाटील श्रावणी श्रीकांत, चि. साळुंखे यश प्रवीण,,कु. आहेर स्वरा पराग, चि. प्रभुदेसाई शौर्य मकरंद, कु. शिरसाठ आयुषी जितेंद्र, चि. वाघ मानस नंदकिशोर, कु. पाटील कल्याणी सचिन, कु. चव्हाण अनन्या दिनेश, कु. सोनवणे रिया नरेंद्र, चि. पवार ओम जितेंद्र, चि. जढाळ वरद संतोष, कु. सोनवणे श्रेया महेंद्र, कु. जोशी मुग्धा राजेंद्र, चि. भदाणे आर्यन देविदास, चि. परदेशी ओम हरिष, चि. साळवे प्रेम सचिन, उच्च माध्यमिक परीक्षेतील गुणवंत चि. श्रीपाद प्रवीण सोनार, कु. जोशी ऋतुजा सचिन, कु. दिवे गुंजन सचिन, चि. देशमुख मानस ज्ञानेश्वर, कु. साळवे वैष्णवी सचिन, कु. दौंड अमृता शंकर, चि. धेंडे वेदांत सचिन, कु. सोनवणे पूर्वा महेंद्र, चि. रामटेके श्रेयस गोरखनाथ, पदवी परीक्षेतील गुणवंत कु. कुलकर्णी मृण्मयी संदीप, कु. कोठावदे साक्षी महेंद्र, चि. कावेडे आर्य नितीन, चि. विभांडीक अथर्व राहूल तसेच पदव्युत्तर पदवी परीक्षेतील चि. शिंदे श्रीधर अनंत यांना क्रीडा क्षेत्रात विशेष प्राविण्य प्राप्त कु. मोरे स्मिता दीपक, श्री. मोरे सिद्धार्थ दीपक, कु. मोहरीर निर्वी मंदार, कु. ढोले परिणिता विनायक, कु. सोमवंशी श्रुती संजय, चि. देशमुख निरंजन गिरीश, चि. कुलकर्णी अभिमन्यू महेश यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
या बक्षीस वितरण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनंसपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले. विद्यापीठाच्या आस्थापना विभागाचे प्रमुख डॉ. नितीन कावेडे यांनी समन्वयन केले. तसेच श्री. योगेश राऊत, श्री. राहूल विभांडीक, श्रीमती उज्वला पवार, श्रीमती मालिका पाटील, श्री. प्रविण सोनार, श्री . तुषार खिरोडे यांनी याकरीता परिश्रम घेतले. या कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी, पाल्य आदी मोठया संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment