‘ईच्छा भगवंताची‎ परिवार’चा सेवा‎ संकल्प;‎ आरोग्य‎ शिबिरातून‎ नागरिकांची आरोग्य तपासणी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, September 23, 2026

‘ईच्छा भगवंताची‎ परिवार’चा सेवा‎ संकल्प;‎ आरोग्य‎ शिबिरातून‎ नागरिकांची आरोग्य तपासणी

  ‘ईच्छा भगवंताची‎ परिवार’चा सेवा‎ संकल्प;‎ आरोग्य‎ शिबिरातून‎ नागरिकांची आरोग्य तपासणी




सोलापूर‎ (कटूसत्य वृत्त):-  पंतप्रधान नरेंद्र‎ मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते‎ १७‎ ऑक्टोबरदरम्यान‎ राबविण्यात‎ येत‎ असलेल्या ‘सेवा संकल्प’ सोहळ्याच्या‎ निमित्त सेटलमेंट‎ परिसरातील ईच्छा भगवंताची नवरात्र महोत्सव‎ मंडळ संचालित ईच्छा‎ भगवंताची गणेशोत्सव‎ मंडळ आणि ‘ईच्छा भगवंताची परिवार’‎ यांच्या‎ वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. शेठ‎ गोविंदजी‎ रावजी‎ आयुर्वेद महाविद्यालय,‎ सोलापूर येथील‎ तज्ज्ञ‎ डॉक्टरांच्या उपस्थितीत‎ हे शिबिर उत्साहात‎ संपन्न‎ झाले.‎ नागरिकांच्या‎ आरोग्याची वेळेवर‎ तपासणी व्हावी, आजारांचे प्राथमिक‎ स्तरावर निदान‎ व्हावे‎ आणि‎ सर्वसामान्यांना तज्ज्ञ‎ डॉक्टरांचे‎ मार्गदर्शन सहज उपलब्ध व्हावे,‎ या उद्देशाने‎ या‎ शिबिराचे‎ आयोजन करण्यात आले होते. स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. पौर्णिमा हिरेमठ यांनी महिलांची‎ तपासणी‎ करून‎ आवश्यक आरोग्यविषयक‎ मार्गदर्शन केले.‎ नेत्ररोग‎ तज्ज्ञ‎ डॉ. सतीश आदीमनी.‎ यांनी डोळ्यांशी‎ संबंधित विविध‎ आजारांची तपासणी केली. तसेच जनरल फिजिशियन‎ डॉ. कुशल जैन‎ यांनी नागरिकांची सर्वसाधारण‎ आरोग्य‎ तपासणी‎ करून आवश्यक मार्गदर्शन‎ केले.‎ यावेळी भाजपा नगरसेवक किसन‎ भाऊ जाधव‎ म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र‎ मोदी‎ यांनी देशाच्या‎ विकासासोबतच ‘सेवा संकल्प’‎ ही‎ कार्यसंस्कृती‎ समाजासमोर ठेवली‎ आहे.‎ त्यांच्या‎ वाढदिवसानिमित्त महिनाभर‎ सुरू‎ असलेल्या‎ सेवा संकल्प सोहळ्यात‎ सहभागी होत नागरिकांच्या आरोग्यासाठी‎ हा‎ उपक्रम राबविण्यात आला. समाजातील‎ प्रत्येक घटकापर्यंत‎ सेवा पोहोचविणे हीच खरी‎ लोकसेवा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,‎ प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण,‎ पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार विजयकुमार देशमुख, सुभाष‎ देशमुख, सचिन‎ कल्याणशेट्टी‎ तसेच सोलापूर शहर‎ मध्यचे आमदार देवेंद्र‎ कोठे, भाजपा‎ शहराध्यक्षा सौ. रोहिणी‎ ताई तडवळकर,नगरसेविका सौ.‎ अंबिकाताई नागेश अण्णा गायकवाड,नगरसेविका सौ.‎ चैत्रालीताई‎ शिवराज गायकवाड यांच्या‎ नेतृत्वाखाली भाजपच्या माध्यमातून‎ सेवा‎ व जनकल्याणाचे विविध‎ उपक्रम राबविले जात‎ असल्याचेही जाधव‎ यांनी सांगितले.‎ मंडळाचे‎ संस्थापक,‎ अध्यक्ष व‎ आधारस्तंभ‎ लक्ष्मण मामा‎ जाधव यांच्या‎ नेतृत्वाखाली‎ तसेच‎ माजी‎ नगरसेवक नागेश‎ अण्णा गायकवाड, ॲड. अनिल‎ दादा जाधव‎ आणि‎ युवा‎ नेते चेतन‎ नागेश‎ अण्णा‎ गायकवाड‎ यांच्या‎ पुढाकारातून हा उपक्रम‎ यशस्वी‎ झाला.‎ यावेळी‎ कैकाडी‎ समाजाचे सचिव‎ सुरजकुमार‎ संभाजी गायकवाड‎ रत्नापूरकर, मंडळाचे उत्सव अध्यक्ष उत्कर्ष‎ विनोद गायकवाड‎ तसेच‎ मंडळाचे सर्व‎ पदाधिकारी, कार्यकर्ते‎ व सदस्य‎ उपस्थित होते.‎

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages