निरा-भीमा नदी काठावरील नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक काळजी घ्यावी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, August 1, 2026

निरा-भीमा नदी काठावरील नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक काळजी घ्यावी

निरा-भीमा नदी काठावरील नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक  काळजी घ्यावी

                                          -प्रांताधिकारी  सचिन इथापे


 

       पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- उजनी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस झाल्याने दुपारी 4.00 वाजता उजनी धरणातून 80 हजार क्युसेक्स तर वीर धरणातून 63 हजार 323 विसर्ग असा एकूण 1 लाख 43 हजार 323  क्युसेक्स इतका विसर्ग  सुरु आहे. वीर धरणातून नीरा नदी पात्रात सोडण्यात आलेला विसर्ग हा निरा नरसिंहपुर (संगम) येथे भीमा नदीत मिसळत असल्याने नीरा व भीमा नदीकाठी पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने निरा-भीमा नदी काठावरील नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक  काळजी घ्यावी, असे आवाहन प्रांताधिकारी  सचिन इथापे यांनी केले आहे.

              उजनी व निरा संगमाचा  विसर्ग  भीमा नदीपात्रात एकत्रित पोहोचणार असल्याने धोक्याची पाणी पातळी वाढ होण्याची  शक्यता आहे. तलाठी व मंडलाधिकारी यांनी  भीमा  नदीकाठच्या सखल गावांना व वाड्यावस्त्यांना तसेच पंढरपूर शहरातील चंद्रभागा नदी काठच्या नागरिकांना  तात्काळ सतर्कतेचा इशारा द्यावा. नदीपात्रातील जनावरे, इलेक्ट्रीक पंप  हलवावे गाव पातळीवर दौंडीद्वारे जाहीर सूचना द्याव्यात . पोलीस प्रशासनाने घाटावर व नदीपात्रात प्रवेश बंदीची अंमलबजावणी सुरू करावी. वाळवंट परिसरातील वारकरी भाविक यांना नदीपात्रातून दूर हलवावे. गस्त वाढवून आवश्यक तेथे बॅरिकेटिंग करावे . पाटबंधारे विभागाने दर तासाला पाणी पातळी व धरणातील विसर्ग बाबत अद्यावत माहिती नियंत्रण कक्षास कळवावी. आरोग्य विभागाने नदीकाठच्या उपकेंद्रावर आपत्कालीन वैद्यकीय पथक व रुग्णवाहिका सज्ज ठेवावी तसेच मुबलक औषध साठा उपलब्ध ठेवावा. वीज वितरण विभागाने नदीकाठचे विद्युत वाहिन्या रोहित्र तपासून आवश्यकतेनुसार वीज पुरवठा खंडित करण्याबाबत आवश्यकती कार्यवाही करावी .

            नगरपालिका प्रशासनाने सकल भागातील पिण्याच्या पाण्याचे स्तोत्र व ड्रेनेज पंप तपासावेत व तात्पुरती निवारा केंद्र सज्ज ठेवावेत. आपत्कालीन परिस्थितीत बोट व जीव रक्षक साहित्य करावे. नियंत्रण कक्ष 24 तास कार्यान्वित ठेवावा. पाणी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन पुरपरस्थितीत नदीपात्रावरील घाट व प्रवेश बंद ठेवावा. सुरक्षेच्या दृष्टीने पुलावरील व नदीकाठावरील वाहतूक आवश्यकतेनुसार वळवावी. भीमा नदी पात्रात पाणी पातळी सातत्याने वाढत असल्याने नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये सर्व विभागांनी पूरनियंत्रणासाठी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी  अशा सूचना ही प्रांताधिकारी सचिन  इतापे यांनी दिल्या

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages