जिल्हा परिषद शेवते शाळेचे शिष्यवृत्ती परीक्षेत 16 विद्यार्थी पात्र
पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- जिल्हा परिषद शेवते शाळेच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. इयत्ता चौथीचे 13 विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र झाले आहेत. तर इयत्ता सातवीचे 3 विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र झालेले आहेत. माहे एप्रिल महिन्यात संपन्न झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता चौथीचे विराज संतोष सोलनकर, तेजश्री सतीश बनकर, स्वरांजली राहुल तोंडले, सार्थक विठ्ठल धोत्रे, महालक्ष्मी अमित गिड्डे, शर्वरी चंद्रकांत पवार, तनुजा येताळा पवार, विराज समाधान मिसाळ, शिवन्या धनाजी कोळी, प्राची लखन सावंत, समृद्धी प्रकाश बोंबीडकर, अनन्या गणेश तोंडले, श्रावणी राहुल जाधव तसेच इयत्ता सातवीचे करण प्रदीप खळगे, स्नेहल संतोष तुपसौंदर, व पृथ्वीराज गणपत सुतार हे विद्यार्थी पात्र झाले आहेत. इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांना वर्गशिक्षक श्री शरद बिरादार तसेच इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांना वर्गशिक्षक विलास नाईकनवरे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
विद्यार्थ्यांच्या या उज्वल यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी बिभीषण रणदिवे, विस्तार अधिकारी दशरथ मोरे, शारदा रासकर, मुख्याध्यापक उज्वला शिंदे, शा.व्य. समिती अध्यक्ष सचिन धोत्रे, उपाध्यक्ष राजू तुपसौंदर व सर्व सदस्य शाळा व्यवस्थापन समिती शेवते तसेच सर्व शिक्षकवृंद व समस्त ग्रामस्थ शेवते यांनी अभिनंदन केले आहे.

No comments:
Post a Comment