कै. काशिराया पाटील सार्वजनिक वाचनालयातर्फे विद्यार्थ्यांना वह्या, पेन व खाऊचे वाटप - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, July 22, 2026

कै. काशिराया पाटील सार्वजनिक वाचनालयातर्फे विद्यार्थ्यांना वह्या, पेन व खाऊचे वाटप

 कै. काशिराया पाटील सार्वजनिक वाचनालयातर्फे विद्यार्थ्यांना वह्या, पेन व खाऊचे वाटप



हन्नूर (कटूसत्य वृत्त):- कै. काशिराया पाटील सार्वजनिक वाचनालय, पितापूर यांच्या वतीने हन्नूर येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत इयत्ता पहिली ते चौथीतील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटपाचा उपक्रम उत्साहात पार पडला.


शनिवार, दि. 18 जुलै 2026 रोजी आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना वह्या, पेन व खाऊचे वाटप करण्यात आले. नवीन शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण व्हाव्यात, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.


यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्रीकांत राठोड, सर्व वर्गशिक्षक, कै. काशिराया पाटील सार्वजनिक वाचनालयाचे सचिव सह्याद्री संजय घोडके, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


या उपक्रमाचा लाभ इयत्ता पहिली ते चौथीतील सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींनी घेतला. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या या शैक्षणिक उपक्रमाबद्दल पालक व नागरिकांनी कै. काशिराया पाटील सार्वजनिक वाचनालयाचे आभार मानून संस्थेच्या कार्याचे कौतुक केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages