मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा अल्पसंख्याक मोर्चातर्फे रक्तदानाचा संकल्प - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, July 22, 2026

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा अल्पसंख्याक मोर्चातर्फे रक्तदानाचा संकल्प

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त

भाजपा अल्पसंख्याक मोर्चातर्फे रक्तदानाचा संकल्प



 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपातर्फे राज्यभर विविध सेवा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून याच उपक्रमाचा भाग म्हणून भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष इद्रिस मुलतानी यांच्या नेतृत्वाखाली राज्यात 150 हून अधिक रक्तदान शिबिरांमधून भाजपाचे 5 हजारांहून अधिक मुस्लिम कार्यकर्ते रक्तदान करणार आहेत. मुंबईतील भेंडी बाजार येथे भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी आणि प्रदेशाध्यक्ष इद्रिस मुलतानी यांच्या हस्ते मंगळवारी या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.

 यावेळी इद्रिस मुलतानी यांनी सांगितले कीमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात विकासजनकल्याण आणि ‘सबका साथसबका विकाससबका विश्वाससबका प्रयास’ या विचारांना अधिक बळ मिळाले आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरातून एक लाख रक्तपिशव्या संकलित करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. त्याच प्रेरणेतून मुस्लिम समाजातील कार्यकर्तेही मोठ्या संख्येने या सेवा अभियानात सहभागी होत असून रक्तदानासारख्या जीवनदायी उपक्रमातून समाजाप्रती आपली बांधिलकी व्यक्त करत आहेत. राज्यभर संकलित होणाऱ्या एक लाख रक्तपिशव्यांच्या संकल्पात अल्पसंख्यांक मोर्चाचाही महत्त्वपूर्ण वाटा असेल. हा राज्यव्यापी रक्तदान उपक्रम सामाजिक ऐक्यसेवाभाव आणि जनकल्याणाचा संदेश अधिक दृढ करणारा ठरत असून कार्यकर्ते समाजसेवेचा संदेश देत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.       


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages