रोहित पवार यांची तब्येत खालावली; सलाईन लावण्यास नकार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, June 15, 2026

रोहित पवार यांची तब्येत खालावली; सलाईन लावण्यास नकार

 रोहित पवार यांची तब्येत खालावली; सलाईन लावण्यास नकार

आजपासून नामदेव पायरीजवळ आंदोलन




पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- विनाअट दोन लाखांपर्यंत सरसकट शेतकरी कर्जमाफी करण्यात यावी. या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पंढरपूर येथे सुरु केलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा रविवारी तिसरा दिवस होता.

तिसऱ्या दिवशीही सरकारकडून मागण्यांबाबत तोडगा निघाला नाही. अन्नत्याग केल्याने रोहित पवार यांची तब्येत बिघडली आहे. तरीही ते आंदोलनावर ठाम आहेत. सोमवारपासून विठ्ठल मंदिरासमोरील नामदेव पायरी येथे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे.

आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी रोहित पवार यांचा बीपी आणि शुगर कमी झाली आहे. त्यांना अशक्तपणा आला असल्याने डॉक्टरांनी सलाईन लावण्याची गरज असल्याचे सांगितले आहे. मात्र, सरकारकडून मंत्री गिरीश महाजन हे मध्यस्थी करण्यासाठी तोडगा काढण्यासाठी आंदोलनस्थळी भेट देणार आहेत. ते आल्यानंतरच सलाईन घेवू, असे रोहित पवार यांनी सांगितले आहे.

राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी पंढरपूरला अन्नत्याग आंदोलनस्थळी उपस्थित राहून आंदोलनाला पाठिंबा दिला. सरकारने कोणत्याही अटी शर्ती न लावता सरसकट कर्जमाफी जाहीर करावी, अशी मागणी यावेळी केली. या आंदोलनाच्या बाजूने पूर्ण ताकदीने उभे राहण्याचे आश्वासन त्यांनी दिले. शेकापचे नेते जयंत पाटील, खासदार बजरंग सोनवणे, खासदार निलेश लंके, आमदार सुनील भुसारा, भावनाताई घाणेकर यांनी अन्नत्याग आंदोलनाला उपस्थित राहून पाठिंबा दिला.

कुटुंबीय झाले भावूक
शेतकऱ्यांच्या विना अट कजर्माफीसाठी रोहित पवार यांनी पंढरपूर येथे 12 जूनपासून अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे. आंदोलनाला तीन दिवस झाले तरी सरकार लक्ष देत नाही. त्यातच रोहित पवार यांची तब्येत बिघडू लागली आहे. या आंदोलनस्थळी पहिल्या दिवसापासूनच रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार हे ठाण मांडून बसले आहेत. तर रविवारी रोहित पवार यांचे यांचं संपूर्ण कुटुंब पंढरपूरच्या आंदोलनात दाखल झाले आहे. वडील राजेंद्र पवार, आई सुनंदा पवार, पत्नी कुंती पवार, मुलगा शिवांश आणि आनंदिता हे सर्व रोहित पवार यांना पाहून भावूक झाले आहेत. सरकारने त्वरीत दखल घेण्याची मागणी त्यांनी केली आहे.

पप्पांचे आंदोलन आणि त्यांचा सुकलेला चेहरा पाहून रोहित पवार यांच्या मुलांच्या डोळ्यात अश्रू आले. मुलांच्या डोळ्यातील अश्रू पाहून रोहित पवार भावुक झाले. मुलांचा हात हातात घेत त्यांनी धीर देण्याचा प्रयत्न केला. यावेळी आंदोलनस्थळी उपस्थित असलेल्या आंदोलनकर्त्यांचे डोळे पाणावले.

संपुर्ण कर्ज माफी करा- जरांगे पाटील
शेतकऱ्यांसाठी रोहित पवार यांचे अन्नत्याग आंदोलन सुरु आहे. खर तर सरकारने या आंदोलनाची वेळच येवू द्यायला नको होती. मात्र, सरकार शेतकरी म्हटले की द्यायला तयार होत नाही. नियम अटी लादून बेजार करत आहे. माझे सरकारला म्हणणे आहे की, एकदाचीच संपुर्ण कर्जमाफी करा, कटकट ठेवू नका, अशी मागणी मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारकडे केली आहे.

राज्यातील सगळा शेतकरी एकवटणार आहे

रोहित पवार यांनी मनोज जरांगे यांना शेतकरी कर्जमाफीच्या जाचक अटी आणि आंदोलनाचे कारण याविषयी माहिती दिली. त्यानंतर मनोज जरांगे यांनी उपस्थितांना संबोधित केले. रोहित पवार हे बळीराजासाठी आंदोलनाला बसले आहेत. शेतकऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे. हा न्याय मिळावा यासाठी राज्यातील सगळा शेतकरी एकवटणार आहे. त्यात कोणतेही दुमत असण्याचे कारण नाही, असे भाष्य यावेळी त्यांनी केले. तसेच शेतकरी वाचला तर आपण वाचणार आहे. शेतकरी वाचला नाही तर राज्य आणि देश कसा चालणार, असा सवालही त्यांनी केला.

तुम्ही आमच्या पार्टीत या…

पुढे बोलताना मनोज जरांगे यांनी मिश्किल भाष्य करत रोहित पवार यांना आमच्या बाजूने यावे, असे आवाहन केले. रोहित पवार यांच्या आंदोलनला चांगला प्रतिसाद आहे. फक्त थोडा घोळ आहे. तुम्ही कितीही पोटतीडकीने केलं तर रोहित पवार यांच्या आंदोलनाला राजकारण हेच म्हटले जाणार आहे. त्यामुळे तुम्ही आमच्या पार्टीत या, अशी मिश्कील टिप्पणी मनोज जरांगे यांनी केली. तसेच आमच्या पार्टीत खूप मचळा आहे. तुम्ही कुठेही बसू शकता, असे जरांगे म्हणाले. तसेच तुम्ही कोणतीही मागणी केली तरी कोणीच काही बोलू शकत नाही. पण तुमच्या पार्टीत आल्यावर प्रश्न सोडवणं खूप अवघड आहे. आमच्या पार्टीत आलं की खूप गर्दी होते. कोणतीही मागणी करता येते, असंही जरांगे म्हणाले.

आपणही त्यांना शेतकरी म्हणून…

तुमच्या पोटतिडकीला किती महत्त्व दिले जाईल माहिती नाही. आपण शेतकऱ्यांसाठी बसलो आहोत. आपण या आंदोलनात तरी ही शेतकऱ्यांची लढाई आहे, असं समजावं. आपण काही रोहित पवार यांच्या राजकारणासाठी आलेलो नाहीत. ते शेतकऱ्यांसाठी लढत आहेत. आपणही त्यांना शेतकरी म्हणून साथ द्यायला हरकत नाही, असेही मत जरांगे यांनी व्यक्त केले.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages