वामनराव शिंदे साहेब आदर्श विद्यालयात पहिल्या दिवसाचा आनंदोत्सव साजरा
सांगोला (कटूसत्य वृत्त):- स्वागतासाठी सांगोल्यातील आदर्श शिक्षण संस्था संचलित वामनराव शिंदे साहेब आदर्श विद्यालयात रंगतदार आणि आनंदोत्सवी वातावरणात शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला.
संस्थाध्यक्षा श्रीमती कौशल्यादेवी शिंदे मॅडम, सांगोला आय टी आय च्या प्राचार्य जमादार मॅडम, मुख्याध्यापक विठ्ठलपंत शिंदे सर प्रमुख उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
सरस्वती व संस्थापक वामनराव शिंदे साहेब यांच्या प्रतिमेचे पूजनास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
शाळेचा परिसर रंगीबेरंगी फुगे, आकर्षक सजावट आणि शैक्षणिक संदेशांनी सजला होता. पाचवीत पहिल्यांदाच शाळेत दाखल होणाऱ्या विद्यार्थी , शिक्षक, पालकांनी टाळ्यांच्या कडकडाटात व फुलांच्या वर्षावात प्रशालेच्या गेटवर प्रमुख मान्यवरांनी गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि कुतूहलाचे भाव खुलून दिसत होते.
विशेष म्हणजे आय टी आय च्या प्राचार्य जमादार मॅडम यांनी विद्यार्थ्यांमध्ये बसून त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला. यावेळी प्रशालेच्यावतीने विद्यार्थ्यांना सर्व शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
मुख्याध्यापक विठ्ठलपंत शिंदे सर यांनी प्रशाला चालू शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांकरिता विविध उपक्रम राबवून गुणवत्तायुक्त , दर्जेदार शिक्षण देणार असल्याचे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष कुंभार , आभार अर्चना गोडसे यांनी मानले, कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

No comments:
Post a Comment