वाखरीत पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, June 29, 2026

वाखरीत पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ

 वाखरीत पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ



 

        

 पंढरपूर,(कटूसत्य वृत्त):- ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री  जयकुमार गोरे  यांच्या हस्ते जिल्ह्यातील राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ आज आयुष्मान आरोग्य उपकेंद्रवाखरी (ता. पंढरपूर) येथे उत्साहात करण्यात आला.

            यावेळी जिल्हाधिकारी  एस. कार्तिकेयनमुख्य कार्यकारी अधिकारी  कुशल जैनजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपूरवाडजिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडेसभापतीपंचायत समिती  शुभम आगवणेतालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधलेवैद्यकीय अधीक्षक डॉ. सरडेडॉ. सुडकेप्रा. आ. केंद्र गादेगावचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आगावणेसांख्यिकी अधिकारी हेमंत पवार हे उपस्थित होते. तसेच परिसरातील जिल्हा परिषद सदस्यपंचायत समिती सदस्यवाखरी गावचे सरपंचउपसरपंचग्रामपंचायत सदस्यग्रामपंचायत अधिकारी श्री. कोळीआरोग्य कर्मचारीपालक व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

             पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या  हस्ते 5 वर्षांखालील बालकाला पोलिओचा डोस पाजून मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी पालकमंत्री महोदय यांनी जिल्ह्यातील आजच्या पल्स पोलिओ मोहिमेस शुभेच्छा देत 'दोन थेंब प्रत्येक वेळीपोलिओवर विजय मिळवू दरवेळीहा संदेश दिला.

              जिल्ह्यातील 4,36,572 बालकांसाठी 6,513 लसीकरण बूथवर 7,222 कर्मचारी कार्यरत आहेत. ते वर्षांखालील एकही बालक पोलिओ डोसपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. कार्यक्रमास उपस्थित पालकांनी आपल्या बालकांना पोलिओचा डोस पाजून मोहिमेत सहभाग नोंदवला.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages