समाजातील प्रत्येक घटकाला शिवसेना ही हक्काची वाटली पाहिजे- हिवरकर पाटील - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, June 24, 2026

समाजातील प्रत्येक घटकाला शिवसेना ही हक्काची वाटली पाहिजे- हिवरकर पाटील

 समाजातील प्रत्येक घटकाला शिवसेना ही हक्काची वाटली पाहिजे- हिवरकर पाटील




नातेपुते (कटूसत्य वृत्त):- उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या विचारधारेवर शिवसेनेची घोडदौड जोरदार चालू आहे.सामान्य माणसाचा विकास होवा म्हणुन समाजकल्याण, रोजगार हमी, उद्योग मंत्री, शिक्षण मंत्री या सारखी महत्त्वपूर्ण खाती एकनाथराव शिंदे यांनी शिवसेनेकडे घेतली.कोणतेही पद मोठं नसतं त्या पदाला काम करून मोठं करायचं असतं हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या कामातून दाखवून दिले आहे म्हणून समाजातील प्रत्येक घटकाला शिवसेनाही हक्काची वाटली पाहिजे असे मत सोलापूर जिल्हा ओबीसी चे जिल्हाप्रमुख राजकुमार हिवरकर पाटील यांनी व्यक्त केले.
       ते वेळापूर ता. माळशिरस येथे घेण्यात आलेल्या शिवसेना ओबीसीच्या बैठकीदरम्यान बोलत होते. यावेळी सोलापूर जिल्हा उपप्रमुख दादासाहेब लोखंडे, माळशिरस तालुका उपप्रमुख तथा शासकीय कृषी समिती सदस्य तानाजीराव भोळे, भोसले,बापूसाहेब लोखंडे,विशाल मोहिते,फरीद शेख, दहिगांव शाखाप्रमुख दत्ता बोडरे उपस्थित होते. यावेळी या बैठकीमध्ये बापूसाहेब लोखंडे यांची सोलापूर जिल्हा संघटक पदी तर सोलापूर जिल्हा सोशल मीडिया प्रभारी म्हणून विशाल मोहिते यांची निवड करण्यात आली. शिवसेनेचे पदाधिकारी व मान्यवर यांनी बापूसाहेब लोखंडे व विशाल मोहिते यांच्या निवडीबद्दल शुभेच्छा दिल्या. या घेण्यात आलेल्या बैठकीसाठी शिंदे गटातील शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages