अन्नछत्र मंडळात सचिव शामराव मोरे यांचा वाढदिवस साजरा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, June 5, 2026

अन्नछत्र मंडळात सचिव शामराव मोरे यांचा वाढदिवस साजरा

 अन्नछत्र मंडळात सचिव शामराव मोरे यांचा वाढदिवस साजरा 





अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाकडून संस्थेचे सचिव शामराव मोरे काका यांच्या ७४ वा वाढदिवस मोठ्या उत्साहात महाप्रसादालयात साजरा करण्यात आला.

दरम्यान सचिव शामराव मोरे काका यांच्या ७४ वा वाढदिवसा निमित्त कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या हस्ते राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची रेखीव व सुंदर प्रतिमा, कृपावस्त्र देऊन सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी न्यासाचे विश्वस्त भाऊ कापसे, मुख्य पुरोहित अप्पू पुजारी, बाबुशा महिंद्रकर  मनोज निकम, शहाजी यादव, सौरभ मोरे, दत्ता मोरे, वैभव मोरे, अतिश पवार, प्रवीण घाटगे, निखील पाटील, दत्ता माने, बालाजी कटारे, स्वामिनाथ बाबर, रोहन शिर्के,  श्री चव्हाण, बुद्धाराम बिष्णोई, मुन्ना कोल्हे, पप्पू कोल्हे,  दत्ता वाघमारे, नुरदिन खासबागदार, प्रमोद स्वामी, शरणप्पा कुंभार, मल्लिकार्जुन बिराजदार, लक्ष्मण बिराजदार, श्रीनिवास गवंडी, गोरख माळी, गणेश पाटील, बसू क्यार, शुभम सावंत, विशाल घाटगे, बाळासाहेब घाटगे, बाळासाहेब पोळ, लक्ष्मण निंबाळ, सादिक बागवान, एम. एम. मकानदार, सतीश महिंद्रकर, नामा भोसले, शरद भोसले, प्रसाद हुल्ले, रमेश हेगडे, अनिल बिराजदार, राजू पवार, तानाजी पाटील, विराज माणिकशेट्टी, शंकर पवार, दरेप्पा जकापुरे, अप्पा हंचाटे, सागर हळगोदे, किरण साठे, नितीन गुब्बीन, राहुल इंडे, समर्थ चव्हाण, विठ्ठल रेड्डी, श्रीमंत जमादार यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.
अनेक मान्यवरांनी भ्रमणध्वनीच्या माध्यमातून सचिव शामराव मोरे काका यांच्या ७४ वा वाढदिवसा निमित्त शुभेच्छा दिले.

चौकट :
जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले महाराजांची सावली-
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले महाराज यांनी ३८ वर्षापूर्वी संस्थेची स्थापना केली. त्यावेळेस पासून शामराव मोरे काका हे मंडळात कार्यरत असून, जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले महाराज हे नेहमी मोरे काकांची ओळख सांगत असतांना माझी सावली असल्याचे सांगतात. एक निस्सीम स्वामी भक्त व कार्यमग्न नेतृत्व म्हणून मोरे काकांकडे पाहिले जाते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages