माळेगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात. - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, April 16, 2026

माळेगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात.

 माळेगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात.




कन्हेरगांव (कटूसत्य वृत्त):- माळेगांव तालुका माढा येथील लोंढे वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त 14 एप्रिल 2026 रोजी विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमात इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसह माजी विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचे सादरीकरण केले. शेतकरी नृत्य, लावणी, कोळीगीत, रिमिक्स गीते तसेच एकांकिका यांद्वारे विद्यार्थ्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बबन किर्ते होते, तर प्रमुख पाहुण्या म्हणून सोलापूर जिल्हा परिषदेच्या सदस्य सविता कोकाटे उपस्थित होत्या. 
       यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्या सविता कोकाटे यांनी विद्यार्थ्यांना गुणवत्ताविकासावर भर देत उज्ज्वल भवितव्य घडविण्याचा संदेश दिला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका श्वेता मस्के, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अमोल लोंढे, उपाध्यक्ष अमोल खरात, सर्व सदस्य, ग्रामस्थ, शिक्षणप्रेमी तसेच भीम जयंती कमिटीचे अध्यक्ष सुदर्शन  लोंढे व सदस्य, माजी विद्यार्थी यांनी सहकार्य केले.
 सूत्रसंचालन सुप्रिया लोंढे , हिम्मत किर्ते यांनी तर आभार सहशिक्षक जोगदंड यांनी मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages