सम्राट विचार मंचच्या वतीने महात्मा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त रक्तदान शिबीर
पेनुर (कटूसत्य वृत्त):- पेनूर ता.मोहोळ येथील सम्राट विचार मंचच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या रक्तदान शिबिराचे उदघाटन मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नवनाथ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रारंभी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करुन दीप प्रज्वलन करून सामूहिक त्रिशरण पंचशील पठण करुन अभिवादन करण्यात आले.
तसेच मोहोळ पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक मा.बाजीराव पोवार साहेब यांनी रक्तदान शिबिरास भेट देऊन मंडळाचे सामाजिक उपक्रम हे कौतुकास्पद आहेत यापुढे देखील असेच सामाजिक उपक्रम राबवावे, असे आवाहन यावेळी त्यांनी केले.
रक्तदान जीवनदान या उदात्त हेतूने समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत, रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी या शिबिराचे आयोजन दरवर्षी करण्यात येते यंदाचे हे पाचवे वर्ष असुन यामुळे अनेक गरजू रुग्णांना नवजीवन मिळते रक्तदानच्या माध्यमातून मानवतेची सेवा करण्याचा संकल्प केला आहे. रक्तदान शिबिरात रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करुन महामानवांना अभिवादन केले आहे असे आयोजक सौरभ आवारे यांनी सांगितले.
यावेळी प्रगतशील बागायतदार आण्णासाहेब देशमुख, जि.प.सदस्य चरण चवरे, सरपंच सुजित आवारे,माजी ग्रा.पं.सदस्य राजेंद्र आवारे, भाजपचे प्रकाश चवरे,हरिदास सावंत,शिवाजी आवारे,राजू राजगुरू,पंकज आवचारे,तानाजी आवचारे ,आनंद आवचारे,आण्णासाहेब आवारे,आण्णासाहेब सावंत,केशव पवार,लखन सोनवणे,गौरव आवारे,प्रणव आवारे, निलरत्न आवारे, साहिल सावंत, मसुदेव सावंत, सतिश आवचारे,अक्षय आवचारे, सुमित आवचारे, सुरज आवचारे, जय आवारे,यशवंत आवचारे, सुदेश आवचारे,आर्यन ओहोळ,अजय गायकवाड,समर्थ फाळके,सचिन गवळी,राम सोनवणे,काका आवारे,भाऊसाहेब आवचारे, सुहास आवचारे, महादेव आवचारे,ऋषी कांबळे,पंकज पाखरे, अक्षय कांबळे, ओम शिरसट, श्रीधर पंडित, आदींसह मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.jpg)
No comments:
Post a Comment