१४८ वी पुण्यतिथी जल्लोषात; अन्नछत्र मंडळात हजारो भक्तांचा महाप्रसाद सोहळा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, April 16, 2026

१४८ वी पुण्यतिथी जल्लोषात; अन्नछत्र मंडळात हजारो भक्तांचा महाप्रसाद सोहळा

 १४८ वी पुण्यतिथी जल्लोषात; अन्नछत्र मंडळात हजारो भक्तांचा महाप्रसाद सोहळा





अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- श्री दिगंबरा दिगंबरा.... श्रीपाद वल्लभ दिगंबरा....! श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त... सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज कि... जय !,  श्रीक्षेत्र अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय...च्या जयघोषात श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात १४८ व्या श्रींच्या पुण्यतिथी निमित्त न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी पहाटे रथोत्सव, विधीवत पूजा, धार्मिक कार्यक्रम, पारायण, महाप्रसाद, रक्तदान, व जिम्नॅशियमचा १८ वा वर्धापन दिन, मान्यवरांच्या भेटी व सत्कार आदी कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले. अन्नछत्र मंडळात शेकडो स्वामी भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतले. न्यासाने केलेल्या नेटक्या नियोजनाने, व्यवस्थापनाने भक्तातून समाधान व्यक्त करण्यात आले असून, अन्नछत्र मंडळात भक्तीचा मळा फुलला..! देश-विदेशातून भक्तांची मांदियाळी..! स्वामी नामाने न्यासाचा परिसर दुमदुमून गेला होता.

दरम्यान श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली न्यासाकडून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त सालाबादा प्रमाणे ह्या ही वर्षी गेल्या ७ दिवसपासून श्री स्वामी समर्थ रथोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. बुधवारी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त रथोत्सवाचा शेवट दिवस असल्याने सर्व अमोलराजे मित्र मंडळ व लेझीम संघ आणि स्वामीभक्तांनी रात्रो १.३० वाजता श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात उपस्थित राहून, श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरातील पूजनानंतर नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी, न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले, न्यासाचे सदस्य सौरभ मोरे यांच्या हस्ते रथाचे पूजन करुन बुधवार पेठेतील श्री स्वामी समर्थ समाधी मठाकडे पालखी मार्गावरून रथ मार्गस्थ करण्यात आले. त्यानंतर तेथील पूजनानंतर श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान येथून श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात रथ आणण्यात आले.

महाप्रसादालयात सकाळी स्वामींचे चरित्र पोती पारायण संपन्न झाले. सकाळी ११.३० वा. श्रींचे व अन्नपूर्णा, महाप्रसादाचे पूजन माजी गृह राज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे, नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी, व मनसेचे राज्य उपाध्यक्ष व संभाजी नगरचे मनसे नेते विनायक (बंटी) म्हशीलकर लोअर परेल मुंबई, डॉ प्रसाद प्रधान, ठाणे, गौरीशंकर हिरेमठ अकलूज, शिवाजीराव गीते पाटील, कळंब जि. धाराशिव यांच्यासह स्वामी भक्तांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अन्नछत्र मंडळातील नैवेद्य श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिर, बुधवार पेठेतील समाधी मठात श्रींना सचिव शामराव मोरे यांच्या हस्ते दाखविण्यात आले. यावेळी शेकडो स्वामीभक्त उपस्थित होते. 

न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी यांच्या मंत्र पठणाने महाआरती संपन्न झाली माजी गृह राज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे व मनसेचे राज्य उपाध्यक्ष व संभाजी नगरचे मनसे नेते विनायक (बंटी) म्हशीलकर लोअर परेल मुंबई यांच्या हस्ते संकल्प सोडण्यात आल्यानंतर भक्तांना महाप्रसाद देण्यात आला. अन्नछत्र मंडळातील परिसरातील रक्तपेढीच्या माध्यमातून न्यासाने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आलेले होते. 

श्री स्वामी समर्थांच्या कृपा आशिर्वादाने न्यास हे भक्तांसाठी विविध विकास कामांच्या बाबतीत आघाडी घेतलेली आहे. यासह  न्यासाने स्वामीभक्त व शहरवासियांच्या सोयीकरिता इन व आऊट डोअर व्यायाम शाळा उपलब्ध करुन दिलेली आहे. आजवर यास उत्स्फूर्त प्रसाद मिळाला आहे. यापैकी इनडोअर असलेल्या मातोश्री श्रीमंत कांतामती विजयसिंहराजे भोसले जिम्नॅशियम सेंटरच्या १८ व्या वर्धापन दिनानिमित्त श्री हनुमान मूर्तीचे पूजन अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.

१४८ व्या श्री स्वामी समर्थांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधुन अनेक मान्यवरांनी अन्नछत्राला भेट दिल्या. अन्नछत्र मंडळात हजारो स्वामी भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतले. स्वामी भक्तांमुळे झालेल्या गर्दीमुळे अन्नछत्र परिसर फुलून गेलेला होता. स्वामी भक्तांनी अन्नछत्र मंडळाच्या परिसरात असलेल्या श्री शमी-विघ्नेह गणेश मंदिर, श्री तुळजाभवानी माता मंदिर, ब्रह्मांडनायक उभी स्वामींची मूर्ती, नियोजित महाप्रसादगृह इमारत, सध्याचे अद्यावत तात्पुरते महाप्रसादालय, कपिला गाय, कारंजा, शिवस्मारक, कार्यरत यात्री निवास -१ , यात्रीभुवन-२ , अतिथी गृह, आऊटडोअर व इनडोअर जीम, प्रशस्त वाहनतळ, टेकडीवरील श्री समर्थ वाटिका, शिवचरित्र प्रदर्शन हॉल, अग्निशमन, रुग्णवाहिका, आश्रयदाते कक्ष हे सर्व न्यासाने भक्तांच्या सेवेर्थ सुरु केलेल्या विविध उपक्रमांचे स्वागत करुन न्यासाचे कौतुक केले. परगावहून आलेल्या पालख्यांचे स्वागत न्यासाच्या वतीने करण्यात आले.

याप्रसंगी मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, विश्वस्त भाऊ कापसे, रामचंद्रराव घाटगे,  मनोज निकम, अप्पा हंचाटे, प्रवीण देशमुख, सनी सोनटक्के, सिद्धाराम टाके, प्रा. सायबण्णा जाधव, सिद्धेश्वर माळी, विश्वनाथ हडलगी, अतिश पवार, अभिषेक लोकापुरे, बाळासाहेब पोळ, रोहित पाटील, योगेश कटारे, रोहन शिर्के, माजी नगरसेवक- रामचंद्र समाणे, किशोर सिद्धे, संजय गोंडाळ, रोहित खोबरे, सौरभ मोरे, वैभव मोरे, कुणाल भालेकर,  स्वामिनाथ बाबर, मैनुद्दीन कोरबू, प्रशांत साठे, प्रवीण घाडगे, बसवराज स्वामी, नितीन होनोळी (करकी), केदार माळशेट्टी, शुभम सावंत, विजय तथा गोटू माने, निखील पाटील, एस.के.स्वामी, बाळासाहेब पोळ, गोरखनाथ माळी, नामा भोसले, शहाजीबापू यादव, सतिश महिंद्रकर, बाळासाहेब घाडगे, मल्लिकार्जुन बिराजदार, दत्ता माने, लक्ष्मण बिराजदार, श्रीनिवास गवंडी, धनंजय निंबाळकर, समर्थ घाडगे, समर्थ चव्हाण, विठ्ठल रेड्डी, किरण साठे, सुमित घाटगे, प्रसाद मोरे, केदार तोडकर, शिवराम काजळे, विशाल कलबुर्गी, नितीन कोबन,  शिवकुमार स्वामी, संभाजीराव पवार, प्रसाद हुल्ले, शरद भोसले, रमेश हेगडे, तानाजी पाटील, राजू पवार, अनिल बिराजदार, किरण शिंदे, तानाजी सूर्यवंशी, जेटेप्पा मुदगी, मल्लिनाथ कोगणुरे, विलास राठोड, चंद्रकांत कुंभार, धानप्पा उमदी,चंद्रकांत हिबारे, नामदेव भोसले, कुमार सलबत्ते, पिंटू हळ्ळूरे, रमेश धोत्रे, काशिनाथ वाले, राहुल इंडे, यश विभूते, ओंकार कांबळे, आदित्य हत्ते, बसवराज स्वामी, रोहित कदम यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.

चौकट : 
*स्वामी भक्तातून समाधान :*
श्री क्षेत्र अक्कलकोट मध्ये आलेल्या स्वामी भक्तांना उच्चांकी तापमानामुळे अन्नछत्र मंडळात महाप्रसादाबरोबरच थंडगार मठ्ठा देण्यात आला. याबरोबरच भक्तांना उन्हाचा त्रास होऊ नये याकरिता महाप्रसादालयात एअर कुलर सिस्टीम व समोर ग्रीन नेटची सोय करण्यात आल्याने स्वामी भक्तातून समाधान व्यक्त करण्यात आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages