डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शांतता समितीची बैठक संपन्न - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, March 25, 2026

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शांतता समितीची बैठक संपन्न

 डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शांतता समितीची बैठक संपन्न



 

    पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- भारताचे संविधान निर्माताभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आगामी 14 एप्रिल 2026 रोजी होणाऱ्या जयंतीनिमित्त रखुमाई सभागृह पोलीस संकुलपंढरपूर येथे शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती.

     भारतरत्न   डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची  जयंती पंढरपूर शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात दरवर्षी उत्साहात साजरी केली जाते.  जयंती निम्मित शांतता समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीस उपविभागीय अधिकारी सचिन इथापेसहा.पोलीस अधिक्षक प्रशांत डगळेपोलीस निरिक्षक दशरथ वाघमोडेटी.वाय.मुजावररेखा घनवटसहा. पोलीस निरिक्षक योगेश लंगुटेनगर अभियंता श्री केसकरमहावितरणचे  अधिकारी तसेच शहरातील व तालुक्यातील जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्षउपाध्यक्ष व कार्यकर्ते व  पोलीस पाटील उपस्थित होते.

       या बैठकीत डॉ. आंबेडकर जयंती डिजेमुक्तशांततामय आणि उत्साही वातावरणात साजरी करावी. जयंती अनुषंगाने लावण्यात येणारे पोस्टरबॅनर झेंडे हे परवानगी घेऊन व योग्य ती खबरदारी  घेऊन लावावे तसेच ते आक्षेपार्ह असु नयेत याची दक्षता घ्यावीमिरवणूक काढण्यापूर्वी किमान तीन दिवस अगोदर परवाना घेणे बंधनकारक आहे. मंडळानी  पारंपरिक वाद्याचा वापर करावा तसेच  सामाजिक उपक्रम  राबवावेत अशा मंडळांना पोलीस प्रशासनातर्फे पारितोषिक देण्यात येणार आहे. आगामी जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मिरवणुकीचा मार्गसार्वजनिक कार्यक्रमांचे नियोजनकायदा व सुव्यवस्था राखणे तसेच पोलिसांना सहकार्य करण्याबाबत उत्सव समितीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

         तसेच जयंती मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नयेयासाठी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन  यावेळी करण्यात आले.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages