Hot Posts

6/recent/ticker-posts

उमेदवारांनी प्रभागातील प्रत्येक घर पिंजून काढून म.न.पा.वर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवावा - भरणे

 उमेदवारांनी प्रभागातील प्रत्येक घर पिंजून काढून म.न.पा.वर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवावा - भरणे


सोलापूर ( कटूसत्य वृत्त) :- सोलापुरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी कोणत्याही अपप्रचाराला बळी न पडता आपल्या प्रभागात फिरून प्रत्येक घर पिंजून काढावे.सोलापूर महानगरपालिकेवर आपलाच झेंडा फडकणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे संपर्कमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले. सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेस भवनात सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरे जात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना मार्गदर्शन करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीप्रसंगी ते बोलत होते.
सोलापूर महानगरपालिकेच्या अंतर्गत विविध विकास कामांसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह आपण स्वतः पालकमंत्री असताना कोट्यवधी रुपयांची कामे केली आहेत.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेली कामे मतदारांच्या घरोघरी पोहचवा. यामुळे विजयाला मोठा हातभार लागणार आहे.कोण काय म्हणतय याकडे दुर्लक्ष करा प्रचार आणि अपप्रचाराला बळी न पडता प्रभागात राहून निवडणूक जिंकण्याच्या उद्देशाने अहोरात्र काम करा,असेही संपर्कमंत्री भरणे यावेळी बोलताना म्हणाले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर - जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान,ज्येष्ठ नेते चंद्रकांत दायमा,तौफिक शेख, हेमंत चौधरी, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले यांच्यासह राष्ट्रवादीचे अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments