सोमेश यावलकर यांना ‘सह्याद्रीरत्न राज्यस्तरीय पुरस्कार’ जाहीर
सांगोला (कटूसत्य वृत्त):- सांगोला नगर परिषदेचे मा.नगरसेवक सोमेश यावलकर यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत टॅलेंट कट्टा महाराष्ट्र राज्य आयोजित राज्यस्तरीय सह्याद्रीरत्न पुरस्कार सोहळा 2025 मध्ये त्यांना मानाचा ‘सह्याद्रीरत्न’ राज्यस्तरीय गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.
महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त, भारत सरकार सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय नोंदणीकृत संस्थेच्या वतीने हा पुरस्कार दिला जात आहे. मा.नगरसेवक सोमेश यावलकर यांनी सांगोल्यात अनेक वर्षे समाजसेवा, नागरिकांच्या अडचणींचे निराकरण, युवकांसाठी मार्गदर्शन, विविध सामाजिक उपक्रम राबविणे, तसेच विकासकामांसाठी सातत्याने प्रयत्न केल्यामुळे त्यांना हा सन्मान मिळाला आहे. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन अनेक युवक सामाजिक क्षेत्रात पुढे येत आहेत.
हा प्रतिष्ठित पुरस्कार सोहळा 14 डिसेंबर 2025, रविवार, पुणे येथे भव्यदिव्य कार्यक्रमात पार पडणार आहे. राज्यभरातील मान्यवरांच्या उपस्थितीत मा.नगरसेवक सोमेश यावलकर यांना ‘सह्याद्रीरत्न’ पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
या निवडीबद्दल मा.नगरसेवक सोमेश यावलकर यांना सांगोला तालुक्यातून शुभेच्छांचा वर्षाव होत असून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
.png)
0 Comments