Hot Posts

6/recent/ticker-posts

महापरिनिर्वाण दिनानिमित्त पाटील विद्यालयात डॉ. बाबासाहेबांना अभिवादन

 महापरिनिर्वाण दिनानिमित्त पाटील विद्यालयात डॉ. बाबासाहेबांना अभिवादन




अनगर (कटूसत्य वृत्त):- कै. शंकरराव बाजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य चंद्रकांत ढोले होते.

यावेळी प्रमुख पाहुणे पंढरीनाथ थिटे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बहुआयामी कार्याचा आढावा घेत, त्यांच्या विचारांचे अनुकरण करण्याचे आवाहन केले. त्यांनी बाबासाहेबांच्या समाज परिवर्तनातील योगदानाची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली.

कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा सन्मान करून त्यांची प्रेरणादायी कामगिरी अधोरेखित करण्यात आली. पंढरीनाथ थिटे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

या प्रसंगी उपप्राचार्य महादेव चोपडे, पर्यवेक्षक माधव खरात, परमेश्वर रमेश चव्हाण, सत्यवान कांबळे, दाजी गुंड, गोरख गायकवाड, उज्वला घोलप, थिटे, राजेंद्र डोके, सोमनाथ गुंड, विलास गुंड, बब्रुवान बोडके, माधवी पाचपुंड, अनुपमा वरवटकर, अनिता लांडगे, रंजना सरक आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महादेव पवार यांनी केले, तर आभार प्रदर्शन माधव खरात यांनी केले.

Reactions

Post a Comment

0 Comments