सोलापूर (कटूसत्य वृत्त):- भैय्या चौक येथे ब्रिटीशकालीन असलेला रेल्वे ब्रीज हा जिर्ण झाला असून तो पाडून त्या ठिकाणी नवीन ब्रिज बांधण्यात येणार आहे. अण्णाभाऊ साठे नगर ते मरीआई चौक हा मार्ग मंगळवार ९ डिसेंबर २०२५ पासून ते ८ आठ डिसेंबर २०२६ असे पूर्ण एकवर्ष रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. पोलीस आयुक्तालयाच्या वतीने हे आदेश देण्यात आले आहेत. त्या बदल्यात पर्यायी मार्ग देण्यात आला आहे, त्याचा वापर करावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
पर्यायी मार्गात मरीआई चौक ते एसटी स्टँडकडे येण्या- जाण्याकरिता मरीआई चौक, शेटे नगर, रेल्वे बोगदा, खमीतकर अपार्टमेंट, निराळे वस्ती, छ. शिवाजी महाराज चौक ते एसटी स्टँड. हा देण्यात आला आहे तर मरीआई चौकाकडून रेल्वे स्टेशनकडे येण्या जाण्याकरिता मरीआई चौक,
नागोबा मंदिर, रामवाडी, पोलीस चौकी, रामवाडी दवाखाना, रामवाडी गोडाऊन, मोदी बोगदा मोदी चौकी ते रेल्वे स्टेशन हा मार्ग सुचविण्यात आला आहे. मंगळवेढ्याकडून हैदराबाद, तुळजापूर, विजापूर,
पुण्याकडे जाणारी वाहतूक नवीन विजापूर रोड ते केगाव बायपासचा वापर करण्यास सुचवले आहे. देगाव व दामणी नगर येथील रहिवाशांनी शहरात येण्या-जाण्याकरिता जगताप हॉस्पिटल, सीएनजी हॉस्पिटल, जानकर नगर, नवीन रेल्वे बोगदा, अभिमान श्रीनगर, अरविंद धाम, जुना पुना नाका हा सुचवला आहे. पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांच्या सहीने हे आदेश देण्यात आले आहेत.
0 Comments