माळीनगर मध्ये १७५ जणांचे रक्तदान
विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
अकलूज (कटूसत्य वृत्त):- येथील दि सासवड माळी शुगर फॅक्टरी चेअरमन व माळीनगर फेस्टिवलचे मुख्य संयोजक राजेंद्र उर्फ रंजनभाऊ गोपाळराव गिरमे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सालाबाद प्रमाणे दि.५ डिसेंबर रोजी माळीनगर गेस्ट हाऊस येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात १७५ रक्तदात्यांनी रक्तदानात सहभाग घेतला असल्याचे डॉक्टर भूषण म्हेत्रे यांनी सांगितले.
हे रक्तदान शिबिर कारखान्याचे नूतन मॅनेजिंग डायरेक्टर गणेश इनामके यांचे अध्यक्षतेखाली तर शिबिराचे उद्घाटन महात्मा फुले पतसंस्थेचे व्हा.चेअरमन महादेवराव एकतपुरे यांचे हस्ते व सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आले.
यावेळी माळीनगर साखर कारखान्याचे संचालक विशाल जाधव, नूतन इंडिपेंडेंट डायरेक्टर मुरलीधर राऊत, शुगरकेन सोसायटीचे चेअरमन अमोल ताम्हाणे, व्हा.चेअरमन कपिल भोंगळे, संचालक जयवंत चौरे, एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी अजय गिरमे,संचालक पृथ्वीराज भोंगळे, दिलीप इनामके, गहिनीनाथ बँकेचे चेअरमन शिरीष फडे, मॉडेल हायस्कूलचे उपप्राचार्य रितेश पांढरे,डॉ.रवींद्र शिंदे,रिंकू राऊत, लक्ष्मण डोईफोडे, मच्छिंद्र हजारे,अनिल बनकर, योगेश कचरे,प्रदीप घाडगे तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. यासह सासवड माळी एज्युकेशन सोसायटीच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने वह्या वाटप करण्यात आले.
शिबिर यशस्वी करण्यासाठी दि सासवड माळी शुगर फॅक्टरी, सासवड माळी एज्युकेशन सोसायटी, माळीनगर विकास मंडळ, महात्मा फुले पतसंस्था, माळीनगर मल्टीस्टेट, व्यापारी मंडळ यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय बांदल, राजेश कांबळे व बाळासाहेब सोनवणे यांनी केले.
त्याचप्रमाणे ६ डिसेंबर रोजी माळीनगर कारखान्याचे चेअरमन तथा माळीनगर फेस्टिवल चे मुख्य संयोजक राजेंद्र उर्फ रंजनभाऊ गिरमे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या गोकुळ निवासस्थानी सकाळपासूनच वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी माळीनगर पंचक्रोशीतील विविध संस्थांचे पदाधिकारी, सभासद, भागधारक,राजकीय ,सहकार,सामाजिक, शैक्षणिक,कला, क्रीडा,डॉक्टर, वकील,पत्रकार, कारखान्याचे अधिकारी,कर्मचारी,विविध क्षेत्रातील मान्यवर यांनी शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती. यावेळी गिरमे यांनी सर्वांच्या सत्काराचा स्वीकार केला व आभार व्यक्त केले.

0 Comments