Hot Posts

6/recent/ticker-posts

प्रज्ञा म्हणाली, “ सर, .... यातील निर्णय घेणारी अधिकारी बनेल आणि मदतीची गरज लागली तर तुम्हाला नक्की सांगेन...! “

 प्रज्ञा म्हणाली, “ सर, .... यातील निर्णय घेणारी अधिकारी बनेल आणि मदतीची गरज लागली तर तुम्हाला नक्की सांगेन...! “ 




अंदाजे ४- ५ महिन्यांपूर्वी मदन देशमुख सरांचा फोन आला आणि एका विद्यार्थिनीला तुमच्या मदतीने मार्गदर्शनाची गरज आहे अशी विनंती केली. मी त्यांना ऑफिसला या म्हणालो . त्यावेळी अकरावीच्या ऍडमिशनच्या फी संदर्भात तक्रार घेऊन प्रज्ञा कोकाटे ही तिचे वडील धनाजी कोकाटे यांच्यासोबत ऑफिसला आले. 

तिचा मुद्दा समजून घेतला, तिने जो मुद्दा उपस्थित केला होता तो बरोबर देखील होता. परंतु दुसरी बाजू ऐकल्यानंतर त्यामध्ये वाद न घालता मार्ग काढणे आवश्यक असल्याचे दिसून आले. त्यात शासनाची चूक होती. पण प्रज्ञा मला अभ्यासू आणि जिद्दी मुलगी वाटली म्हणून त्यावेळी प्रज्ञाची संपूर्ण फी भरण्याची तयारी पण मी दाखवली. पण प्रज्ञा ही स्वाभिमानी होती. ती म्हणाली “ सर, मला फी साठी पैसे नको. आवश्यक वाटलं तर मी नक्की तुम्हाला संपर्क करेन; पण आता वडिलांच्या मजुरीवरच मी संघर्ष करत शिक्षण करेन.. आणि एक दिवस या प्रक्रियेत अडचणच येणार नाही असा निर्णय घेणारी व्यक्ती/अधिकारी बनेन...”

असे म्हणून प्रज्ञा गेली. तिला जाताना भरपूर शुभेच्छा दिल्या. प्रज्ञा देखील खूप आनंदी आणि आत्मविश्वासाने भरल्यासारखी वाटत होती. त्यानंतर प्रज्ञाची भेट नाही. २६ डिसेंबर रोजी तिच्या आणि तिची मैत्रीण स्नेहल काशिनाथ वाघमोडे यांच्या अपघाताची आणि त्यात झालेल्या दुर्दैवी मृत्यूची बातमी मनाला चटका लावून गेली. अशा आई-वडिलांच्या हाताला आलेल्या, शिकून जगाला गवसणी घालण्यासाठी तयार झालेल्या मुली रस्ते अपघातात जाणे हे अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. संघर्ष करणाऱ्या, आई-वडिलांचा स्वाभिमान टिकवणाऱ्या, जिद्दीने शिकणाऱ्या अशा मुलींच्या अकाली निधनाने अत्यंत दुःख झाले. यातून कुरुल- विजापूर रोड वाहतूक, मोहोळ तालुक्यातील रस्ते अपघात, वाहतुकीचे नियम, विद्यार्थ्यांची गाडी चालवणे , पोलीस आणि आरटीओ प्रशासनाचे दुर्लक्ष या आणि इतर अनेक मुद्द्यांवर चर्चा होणे आवश्यक आहे. 


दोन्ही जिद्दी रणरागिनींना भावपूर्ण श्रद्धांजली ! 


ॲड. श्रीरंग लाळे,

मोहोळ, जि.सोलापूर.

मो.9421909088


https://www.facebook.com/share/1S7K8Sbokn/

Reactions

Post a Comment

0 Comments