Hot Posts

6/recent/ticker-posts

ब्रह्मांड कट्टा अंतर्गत ब्रह्मांड संगीत कट्टा मुख्य शाखेचा शतकोत्सव संगीत कट्टा दंद्वगीताने बहारला

 ब्रह्मांड कट्टा अंतर्गत ब्रह्मांड संगीत कट्टा मुख्य शाखेचा शतकोत्सव संगीत कट्टा दंद्वगीताने बहारला



ठाणे : ब्रह्मांड कट्टा अंतर्गत गेली आठ वर्ष सातत्याने सुरु असलेला ब्रह्मांड संगीत कट्टा मुख्य शाखेचा शंभरावा संगीत कट्टा रविवारी 21 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 5.00 वाजता ऋतू इस्टेट फेडरेशन हॉल, पातलीपाडा ठाणे येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. ब्रह्मांड संगीत कट्टयाच्या ठाणे शहरात विविध ठिकाणी आठ वेगवेगळ्या शाखा कार्यरत आहेत.  त्याच आठ शाखांपैकी ब्रह्मांड संगीत कट्टा मेन शाखेचा शतकोत्सव संगीत कट्टा सर्व दंद्वगीते गाऊन साजरा करण्यात आला. 
कार्यक्रमाला सुरूवाती पासूनच धमला येत गेली सर्व रसिकानी ताल थरला तो लता सुब्रमण्यम व सचिन नाईक यांच्या ओ हसीना जुल्फो वाली जाने जहाँ, रितेश पाटील व रचना पाटील दांपत्यांनी में तेरा तोता तु मेरी मैना तर मराठी गीतां मध्ये निलिमा भोपळे व धैर्यशील भोपाळे यांच्या हृदयी वसंत फुलताना, ही नवरी असली या गाण्यानी भोपळे दांपत्य देखील नाचले व फुगडीचा फेर धरला. योगगुरु बापू भोगटे व स्वाती देशमुख यांच्या अच्छा जी मैं हारी चलो मान जाओ ना या देव आनंद सारखी एकटिंग करून बापू यांनी रसिकांची मने जिंकली. 
सदर कार्यक्रमात सचिन काकडे, हेमंत मयेकर, नीलम भोगटे, मीरा वेलिंग, प्रल्हाद माघाडे, ममता चौधरी, चंद्रशेखर वाघमारे, मीना फरिया, अनुराग शर्मा, स्वाती महाजन, किशोर ठक्कर, नीता संक्रानी, प्राजक्ता संगवई,  सुनील कोकणे, स्वाती  खासनिस, भारत अमेसर, रचना पाटील, रितिश पाटील, अभिषेक राणे तसेच पहिल्यादां भाग घेऊन स्नेहा सन्नेक व सुरेश सन्नेक या गायक कलाकारांनी एक से बढकर एक गाणी गाऊन रसिक प्रेक्षकांना मंत्र मुग्ध केले. 

ब्रह्मांड संगीत कट्टयाच्या मेन शाखेच्या शतकोत्सव संगीत कट्ट्याला संस्थापक राजेश जाधव यांनी शुभेच्छा दिल्या तसेच ही नि:स्वार्थी सेवा अशी गायक व रसिक प्रेक्षकांसाठी अशीच सुरु राहिलं असे प्रतिपादन केले. शंभराव्या संगीत कट्ट्यास संगीत कट्ट्याचे पहिले अध्यक्ष कै. अरुण दळवी काका यांच्या पत्नी शोभा दळवी तसेच त्यांच्या दोन्ही मुली अपूर्वा- अंकिता व बहीण सीमा सावंत ब्रह्मांड कट्ट्याचे अध्यक्ष महेश जोशी, ब्रह्मांड कलासंस्कार अध्यक्षा वर्षा गंद्रे, प्रसिद्ध गायक सावनकुमार सुपे, उमेश बोपलकर उपस्थित होते. 
        
       ब्रह्मांड संगीत कट्ट्याचे सचिव हेमंत मयेकर व सचिन काकडे केलेल्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Reactions

Post a Comment

0 Comments