आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा सामाजिक पुढाकार
करंजाळी गावठा येथील शाळेला विद्यापीठातर्फे ५० बेंचेसची भेट
नाशिक :(कटूसत्य वृत्त):- - महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठार्फे दिंडोरी तालुक्यातील करंजाळी गावठा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला ५० लाकडी बेंचेस (शालेय डेस्क) सुपूर्द करण्यात आले. विद्यापीठाचे मा. कुलगुरु यांच्या संकल्पनेतून आणि कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हा शैक्षणिक मदतीचा उपक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू, वित्त व लेखाधिकारी श्री. बोधिकिरण सोनकांबळे, उपकुलसचिव श्री. महेंद्र कोठावदे, जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्निल तोरणे, श्री. संजय मराठे, श्री. वाय.जी. पाटील, श्री. ज्ञानेश्वर राऊत, श्री. महेश बिरारीस, शाळेचे शिक्षक श्री. दादा इथापे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी कुलसचिव डॅा. राजेंद्र बंगाळ सांगितले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा मिळाव्यात, हा विद्यापीठाचा मुख्य उद्देश आहे. विद्यापीठातर्फे हे ५० बेंचेस विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी देणगी स्वरुपात देण्यात आले आहेत. या साहित्याचा वापर केवळ शैक्षणिक कामासाठीच व्हावा आणि त्याची योग्य देखभाल केली जावी ही शाळा प्रशासनाची जबाबदारी राहील. सामाजिक जाणिवेच्या उपक्रमांतून विद्यापीठातर्फे शाळेला मदत करत असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी वित्त व लेखाधिकारी श्री. बोधिकिरण सोनकांबळे यांनी सांगितले की, विद्यापीठाकडून गरजू शाळेला साहित्याची मदत म्हणून देण्यात आलेले बेंचेसचा वापर विद्यार्थ्यांच्या कामी येईल. विद्यापीठाकडून करंजाळी गावठा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला वस्तूच्या स्वरुपात करण्यात आलेली मदत हा कौतुकास्पद उपक्रम आहे. त्याचा विद्यार्थ्यांना मोठया प्रमाणात उपयोग होईल असे त्यांनी सांगितले.
याकार्यक्रमाचे समन्वयन जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्निल तोरणे यांनी केले. विद्यापीठाच्या या निर्णयामुळे करंजाळी गावठा येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांच्या फायदा झाला असून, करंजाळी गावठा येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक श्री. दादा इथापे यांनी विद्यापीठाचे आभार मानले आहेत.
.jpeg)
0 Comments