दत्त जयंती निमित्त सामाजिक सलोखा- महारुद्र परजणे
नातेपुते (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते गावात पोलीस स्टेशन व दत्त प्रतिष्ठान यांच्या वतीने पोलीस स्टेशन व परवतेश्वर मंदिर याठिकाणी दत्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
या उत्सवात पोलीस दल आणि सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन समाजसेवा व धार्मिक सलोख्याचा आदर्श घालून दिला.दत्त जयंतीच्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पहाटेपासून भाविकांनी श्री दत्त महाराजांच्या पादुका दर्शनासाठी गर्दी केली. सकाळी मूर्ती व पादुकांचे अभिषेक पार पडले आणि मान्यवरांच्या हस्ते महाआरती झाली. दुपारी श्री दत्त चरित्र ग्रंथाचे वाचन आणि सामुदायिक भजन झाले, ज्यात स्थानिक भक्तांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. सायंकाळी फुलांची पुष्पवृष्टी झाली. त्यानंतर दत्तगुरुचा पाळणा होऊनआरती करण्यात आली. आरतीनंतर उपस्थित सर्व भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी दोन्ही ठिकाणी शेकडो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
या कार्यक्रमास नातेपुते पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी, प्रतिष्ठानचे पदाधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
चौकटीत :
पोलीसांचे सामाजिक व धार्मिक उपक्रमांतील सहभाग लोकांशी नाते अधिक मजबूत करण्यासाठी आवश्यक असल्याने या उपक्रमातून सामाजिक एकोपा आणि सदभावनेचा संदेश समाजात जात असतो
महारूद्र परजणे ( सपोनि नातेपुते पोलीस ठाणे )
.jpg)
0 Comments