एक कृतीशील विज्ञानवादी विचारवंत आपल्यातून गमावला - नंदकुमार फाटे , मोहोळ शाखेच्या वतीने पन्नालाल सुराणा यांना आदरांजली
मोहोळ(कटूसत्य वृत्त):-जेष्ठ समाजवादी विचारवंत व राष्ट्र सेवादलाचे माजी अध्यक्ष साथी पन्नालाल(भाऊ) सुराणा यांचे नुकतेच निधन झाले.त्यांना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती मोहोळ शाखेच्यावतीने आदरांजली वाहण्यासाठी सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक सोसायटीच्या सभागृहात गुरुवारी ४ डिसेंबर रोजी शोक सभेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी अध्यक्ष स्थानावरून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मलून समितीचे जिल्हा अध्यक्ष नंदकुमार फाटे यांनी वरील उद्गार काढले.
यावेळी ॲड.गोविंद पाटील यांनी पन्नालाल सुराणा यांच्या आठवणीला उजाळ देताना ते तरुणांना पुढे करून नेतृत्व संधी कशी द्यायची याविषयी आठवणी सांगितल्या, तर महाराष्ट्र अंनिस राज्य सरचिटणीस सुधाकर काशीद ,अंनिस जिल्हा कार्याध्यक्ष धर्मराज चवरे,यू.एफ.जानराव, रमेरा अदलिंगे, डी.व्ही.चवरे, ॲड.आकाश कापूरे,अनिल कोरे,यांनी मनोगते व्यक्त केली.
त्यावेळी मोहोळ अंनिस कार्याध्यक्ष बिरमल खांडेकर,प्रधान सचिव - संदिप साळवे, ॲड.श्रीरंग लाळे,मनोहर गोडसे,महंमद अबदुल इनामदार, हरी सरवदे,कांबळे, तुषार साठे, मोहन व्यवहारे आदि उपस्थित होते.सुधाकर काशीद यांनी सुत्रसंचालन केले , तर संजय भोसले यांनी आभार मानले .
फोटो : साथी पन्नालाल सुराणा
0 Comments