Hot Posts

6/recent/ticker-posts

लोकनृत्य स्पर्धेत जिल्हा परिषद शेवते शाळेचा प्रथम क्रमांक

 लोकनृत्य स्पर्धेत जिल्हा परिषद शेवते शाळेचा प्रथम क्रमांक




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जिल्हा परिषद सोलापूर आयोजित विद्यार्थी गुणवत्ता शोध चाचणी (टॅलेंट हंट) पंढरपूर तालुकास्तरीय स्पर्धा जिल्हा परिषद केंद्र शाळा चळे या ठिकाणी पार पडल्या. ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी प्रतिवर्षी जिल्हा परिषद सोलापूर टॅलेंट हंट स्पर्धा आयोजित करते.
टॅलेंट हंट स्पर्धे अंतर्गत समूह लोकनृत्य स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शेवते शाळेने मोठ्या गटातून प्रथम क्रमांक पटकावला. तसेच शेवते शाळेची जिल्हास्तरीय लोकनृत्य स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

पारंपारिक आदिवासी लोकनृत्य कलेचा आगळावेगळा, दर्जेदार,  नमुना शेवते शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केला. तसेच तालुकास्तरीय निबंध स्पर्धेत तेजश्री सतीश बनकर इयत्ता चौथी या विद्यार्थिनीने ही तालुक्यातून तृतीय क्रमांक मिळवला आहे. विद्यार्थ्यांच्या या उज्वल यशासाठी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे मा. संचालक दशरथ भाऊ खळगे, गटशिक्षणाधिकारी मारुती लिगाडे, केंद्रप्रमुख दशरथ मोरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणपत सुतार, उपाध्यक्ष दिगंबर तोंडले, सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य तसेच समस्त ग्रामस्थ शेवते, शाळेच्या मुख्याध्यापिका उज्वला शिंदे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

या लोकनृत्य गीताच्या यशस्वीतेसाठी सहशिक्षक विलास नाईकनवरे, मधुकर कोरके, कौशल्या चव्हाण, अनिल खोटे, अतुल आंबेकर, शरद बिरादार, सुचिता पाटील यांनी परिश्रम घेतले.
Reactions

Post a Comment

0 Comments